ताज्याघडामोडी

सोलापूर जिल्ह्यात महिला समृद्धी योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ जिल्हा व्यवस्थापक यांचे आवाहन

सोलापूर दि.1 जानेवारी 2025 (जिमाका) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) मार्फत मांग, मातंग, मिनी-मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गोराडी, मादगी व मादिगा या जातीतील समाज बांधवांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. महिला समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी 10 जानेवारीपर्यत अर्ज सादर करावेत, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक आर.एच.चव्हाण यांनी केले आहे.
सन 2024-25 या वित्तीय वर्षासाठी राष्ट्रीय मागासवर्ग वित्तीय विकास महामंडळ दिल्ली व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) मार्फत महिला समृध्दी योजनेसाठी 1 लाख 40 हजार रुपया प्रमाणे योजना सुरु करण्यात आली असून यामध्ये शहरी व ग्रामीण भागासाठी 50 टक्के आरक्षण होते, सदर योजनेचे अर्ज सादर करणेबाबत कळविण्यात आले होते. परंतु महिला समृध्दी योजने अंतर्गत उद्दिष्टापेक्षा कमी अर्ज प्राप्त झाले असल्याने योजनेच्या उद्दिष्ट पुर्तीसाठी लाभार्थी निवड समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी यांनी सूचना दिल्या आहेत.
महिला समृध्दी योजने अंतर्गत कर्ज मागणी अर्ज वितरणाची व स्विकारण्याची कार्यवाही दिनांक 30 डिसेंबर 2024 ते दिनांक 10 जानेवारी 2025 पर्यंत महामंडळाचे कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृह, सात रस्ता, शासकीय विश्रामगृहाच्या पाठीमागे, बीग बजार समोर, सोलापूर सुरु असून, या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक आर.एच.चव्हाण, यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *