डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नोलॉजीकल यूनिवर्सिटी लोणेरे अंतर्गत आंतर महाविद्यालयीन कबड्डी या विभागीय क्रीडास्पर्धे मध्ये सोलापूर झोन च्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादित केले आहे. सोलापूर झोन च्या संघात कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या तीन पुरुष खेळाडू व सहा महिला खेळाडूंचा समावेश होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नोलॉजीकल यूनिवर्सिटी लोणेरे व यशोदा टेक्निकल कॅम्पस यांच्या संयुक्त विद्यमाने आंतर विभागीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेमध्ये सोलापूर झोन मधील विविध महाविद्यालयातील खेळाडूंचे संघामध्ये निवड झाली होती. या संघात कर्मयोगीच्या सहा मुली खेळाडू होत्या. यामध्ये मुलींच्या संघाने विजेतेपद पटकाविले. कु. सुहानी यादव ( कर्णधार), वृशाली बाबर, रेवती घळके, अर्चना कांबळे, पूनम काळे, राधिका शिंदे, ऋतुजा कदम, भक्ति मोरे, रुद्रक्षी यादव, तेजस्विनी कांबळे, साक्षी महापूरकर व माधवी पांढरे यांनी उत्कृष्ट कामगिरी करत संघास विजेतेपद पटकावून दिले. मुलींच्या संघाचे सराव शिबीर कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी येथे पार पडले. या संघास प्रा. गणेश बागल यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच मुलांच्या संघाने उपविजेतेपद पटकावले. यामध्ये सोलापूर झोन मधील उत्कृष्ट खेळाडू निवडून सोलापूर झोन चा संघ तयार करण्यात आला होता. त्यामध्ये कर्मयोगीच्या तीन खेळाडूंचा समावेश होता. या संघाचे सराव शिबीर एम जी एम कॉलेज ऑफ इंजिनिरिंग नांदेड येथे पार पडले. यावेळी संघ प्रशिक्षक म्हणून प्रा. मनोज राठोड यांची नियुक्ती करण्यात आली होती.
श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे विश्वस्त श्री. रोहन परिचारक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, सोलापूर झोन चे सचिव प्रा. शिवशारण कोरे, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए बी कणसे, रजीस्ट्रार श्री. जी डी वाळके, उप प्राचार्य प्रा. जे एल मुडेगावकर, संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. आशीष जोशी, विभागप्रमुख प्रा. डॉ. एस व्ही एकलारकर, प्रा. अनिल बाबर, प्रा. सोमनाथ लंबे, प्रा. दीपक भोसले, प्रा. अभिनंदन देशमाने, तसेच सर्व प्राध्यापक यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.