ताज्याघडामोडी

सिद्धेवाडीचे सुपुत्र डॉ.विठ्ठल जाधव यांचा उद्या होणार राष्ट्रीय स्नेहबंध पुरस्काराने गौरव

वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल

सिद्धेवाडी येथील डॉ.विठ्ठल शिवाजी जाधव यांची स्व. हरीश्चंद्र फाऊंडेशनच्या वतीने दिल्या जाणाऱ्या “राष्ट्रीय स्नेहबंध पुरस्कारासाठी” निवड करण्यात आली आहे. येत्या 24 डिसेंबर रोजी सोलापूर येथील फडकुले सभागृहात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा विचार करून या राष्ट्रीय पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली आहे.
घरची गरिबी आणि हलाखीच्या परिस्थितीत त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. कॉलेजचे शिक्षण घेत असताना पंढरपूर येथील मुकुल भोसले यांच्या हॉस्पिटलमध्ये ते कित्तेक दिवस डॉ. भोसले यांच्यासाठी सेवक म्हणून काम करत होते. शिक्षण घेत-घेत फारच जिद्दीने आणि कष्टाने त्यांनी वैद्यकीय महाविद्यालय आष्टा येथे प्रवेश मिळवला. त्यांचे वैद्यकीय शिक्षण आण्णासाहेब डांगे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आष्टा येथे ऑनरेबल श्री. आण्णासाहेब डांगे यांच्या कृपाशीर्वादानेच चांगले गुण मिळवून पूर्ण झाले. डांगे साहेबांची खूप मदत झाली, अन्यथा गरिबीमुळे कॉलेजची फी भरण्यासाठी मुश्किल झाले होते.प्रसंगी आदरणीय आण्णांनी वेळोवेळी मदत केली; आणि 2007 ते 2011 या काळात आदर्श डॉक्टर बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी हे शिक्षण पूर्ण केले.संघर्षमय जीवन जगत अतीशय जिद्दीने आणि चिकाटीने ते आपला व्यवसाय प्रामाणिकपणे करत आहेत. अगदी लहानपणापासून गावातील बरीच शिक्षक मंडळी याचे साक्षीदार आहेत.डॉक्टर झाल्यापासून ते आजही परिसरातील अंध-अपंग व मूकबधिर व्यक्ती, शालेय गरीब विद्यार्थी, माजी सैनिक आणि ज्यांना मुलगा नाही असे वृद्ध यांना मोफत सेवा देण्याचे महत्त्वपूर्ण काम करीत आहेत.व्यायाम आणि खेळ त्यांच्या खूप आवडीचे क्षेत्र. साधारण 1998 ते 2007 या काळातील आपल्या गावातील आमच्या नवजीवन क्रिकेट संघात एक उत्कृष्ट बॉलर म्हणून ते ओळखले जायचे. वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी अगदी मनापासून चांगली सेवा बजावली आहे, बजावत आहेत. कोविड काळात पहिल्या लाटेचे काही दिवस वगळता त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता कितीतरी पेशंटचे जीव वाचवले. अनेक सामाजिक कार्यात ते हिरीरीने सहभागी असतात.
वैद्यकीय क्षेत्राबरोबरच त्यांना राजकारणाचीही विशेष आवड असल्याचे ते अनेकदा बोलून दाखवतात. ग्रामपंचायत नंतर त्यापेक्षा पुढच्या निवडणुकीत सहभागी व्हायचं आहे असे ते सांगतात. विचार चांगला असेलही; पण वैद्यकीय क्षेत्र हे गरीब रुग्णांना सेवा देण्याचे खूप छान क्षेत्र आहे. त्यांनी याच क्षेत्रात उत्तम कार्य करावे असे माझे प्रामाणिक वैयक्तिक मत. पुरस्कारासाठी त्यांची योग्य निवड झाली. त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन.

– एम. बी. जाधव (गुरुजी) सिद्धेवाडी.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *