ताज्याघडामोडी

पंढरपूरसाठी आमदार अभिजित पाटील यांची मोठी मागणी ‘केंद्रीय कृषी उडान योजना २.०’ अंतर्गत पंढरपुर परिसरात विमानतळ करावे

पंढरपुर येथे ‘केंद्रीय कृषी उडान योजना २.०’ अंतर्गत विमानतळ व्हावे या मागणीसाठी आमदार अभिजित पाटील यांनी केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधरजी मोहोळ यांना निवेदन देत या परिसरात विमानतळ झाल्यास कशा पद्धतीने कृषी व पर्यटन क्षेत्रास फायदा होईल याची माहिती दिली. सोलापुर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र पंढरपुराला दक्षिण काशी तर विठ्ठलाला महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणतात. विठ्ठलमंदिर अवघ्या महाराष्ट्राचे एक चिरंतन स्फूर्ती स्थान आहे. गोरगरिबांचा देव म्हणून श्री विठ्ठलाची ओळख आहे. पंढरपूरमध्ये वर्षातून चैत्री, आषाढी, माघी व कार्तिकी एकादशी निमित्त मोठ्या यात्रा भरतात.त्यातील दरवर्षी आषाढी एकादशीला लाखो भाविक येथे वारीसाठी व श्री विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. अशा या भारताची दक्षिण काशी समजल्या जाणार्‍या श्रीक्षेत्र पंढरपूर येथे केंद्रीय ‘कृषी उडान योजना २.०’ या योजनेअंतर्गत विमानतळ असणे गरजेचे आहे.हि बाब आमदार अभिजित पाटील यांनी केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधरजी मोहोळ यांच्या निदर्शनास आणून दिली. श्रीक्षेत्र पंढरपूर येथे विमानतळ झाल्यास श्रीक्षेत्र शिर्डी प्रमाणे धार्मिक पर्यटन स्थळ असलेल्या पंढरपूरचाही विकास होईल. या विमान सेवेमुळे अक्कलकोट, गाणगापूर, तुळजापूर इत्यादी तीर्थक्षेत्रांना भेट देणाऱ्या भाविकांसाठी गतिमान वाहतुकीची सुविधा उपलब्ध होईल. त्याशिवाय परदेशातील भाविकांची रिघ वाढेल, मागील काही वर्षात आषाढी वारीत परदेशी भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत असल्याने विमान सेवा सुरु झाली तर परदेशातील भाविकांसाठी सोयीचे ठरणार आहे.श्रीक्षेत्र पंढरपूर येथे विमानतळ झाल्यास शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठांपर्यंत कमी वेळात आणि कमी खर्चात पोहोचवता येईल. शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन दूरच्या बाजारपेठांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत होईल आणि त्यांचे उत्पन्नात वाढ होईल. त्याचबरोबर शेतकऱ्यांना आर्थिक लाभासह त्यांच्या उत्पादनाला जगभरात ओळख मिळेल.म्हणूनच या संदर्भात मंत्री महोदयांना निवेदन दिले असून यावर सकारात्मक कार्यवाही होईल हा विश्वास अभिजित पाटील यांनी व्यक्त केला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *