सोलापूर दिनांक 19 :- गोशाळांमध्ये ठेवण्यात येणाऱ्या देशी गायींच्या पालन पोषणासाठी प्रति दिन, प्रति गाय पन्नास रुपये अनुदान देण्यात येणार आहे. योजनेसाठी महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे नोंदणीकृत व सदर शासन निर्णयामधील नमुद निकषानुसार पात्र गोशाळा, गोसदन पांजरापोळ व गोरक्षण संस्थांनी दि.31 डिसेंबर 2024 रोजीपर्यंत ऑनलाईन अर्ज करावा असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, डॉ. विशाल येवले यांनी केले आहे.
सदर योजनेचा उद्देश व स्वरुप, अनुदान पात्रतेच्या अटी व शर्ती, योजनेची अंमलबजावणी, तसेच योजनेचा ऑनलाईन अर्ज व त्यासोबत जोडावयाची अनुषंगिक कागदपत्रे इत्यादी बाबतची सविस्तर माहिती www.mahagosevaayog.org व https//schemes.mahagosevaayog.org या संकेतस्थळावर उपलबध करुन देण्यात आलेली आहे.
पशुसंवर्धन विभागाच्या दि. 8 ऑक्टो. 2024 च्या शासन निर्णयातील नमूद पात्रतेच्या अटीनुसार इच्छुक पात्र संस्थांनी ऑनलाइन पध्दतीने विहित नमुन्यातील अर्ज उपरोक्त संकेतस्थळावर दि.31 डिसेंबर 2024 रोजीपर्यंत ऑनलाईन सादर करावेत. महाराष्ट्र गोसेवा आयोग कार्यालयाकडे थेट प्रस्ताव सादर केलेला तसेच ई-मेल किंवा तत्समद्वारे सादर केलेले अर्ज ग्राहय धरले जाणार नाहीत. असे आवाहनही जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, डॉ. विशाल येवले यांनी केले आहे.