ताज्याघडामोडी

UPI Payment पेमेंट करताय का ? ३१ डिसेंबरपर्यंत करा हे काम नाहीतर ट्रांजेक्शन होईल बंद

पेमेंट करण्यासाठी तुम्ही डिजिटल प्लॅटफॉर्म वापरत आहात का? जर तुम्ही गूगल पे, फोन पे, पेटीएम, भीम किंवा इतर ऑनलाइन बँकिंगचा वापर करत असाल तर तुमच्याकडे UPI आयडी असणे आवश्यक असतं.

डिजिटल पेमेंट अ‍ॅप्सद्वारे पैशांची देवाण-घेवाण करायची असेल तर UPIआयडी आवश्यक असतो. पण युपीआयचा वापर करणाऱ्यांपैकी काही UPI वापरकर्त्यांचा व्यवहार सेवा बंद होऊ शकते. नेमकं काय कारण आहे ते आपण जाणून घेऊ.

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ने नुकतीच UPI द्वारे एक अधिसूचना प्रसिद्ध केली होती. त्यानुसार UPIसक्रिय असणे आवश्यक आहे. जर गेल्या एक वर्षात कोणताही व्यवहार झाला नसेल तर तुमचा UPI आयडी डिअ‍ॅक्टिव्ह केला जाईल. तुम्हाला तुमचा UPIआयडी अकाऊंट डिअ‍ॅक्टिव्हेट करायचा नसेल तर त्यासाठी तुम्हाला तुमचे अकाऊंट ३१ डिसेंबरपूर्वी अ‍ॅक्टिव्ह करावे लागेल.

UPI आयडी अ‍ॅक्टिव्ह करण्यासाठी तुम्हाला एखाद्याशी व्यवहार करावा लागेल म्हणजेच पेमेंट किंवा पैशांची देवाण- घेवाण करावी लागेल. तुम्ही तुमच्या UPI आयडीद्वारे बिल पेमेंट, फोन रिचार्ज, भाडे भरणे इत्यादी इतर कोणतेही पेमेंट करू शकता. पण तुम्हाला हे काम ३१ डिसेंबरपूर्वी करावे लागेल. तुम्ही असे न केल्यास, तुमचा UPIआयडी NPCI नियमांनुसार डिअ‍ॅक्टिव्ह केला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *