पंढरपूर: बार्डी-करकंब येथील धनश्री उद्योग समूहाचे अध्यक्ष सुरेश (भाऊसाहेब) अंबुरे (सर) यांची भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाउपाध्यक्ष पदी निवड झाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगोला येथे झालेल्या बैठकीत निवड केल्याचे जाहीर केले. सुरेश अंबुरे यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीत भाजपचे प्रभावीपणे कार्य केले आहे.पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्या चांगल्या पद्धतीने पार पाडल्या आहेत. त्यांच्या […]
ताज्याघडामोडी
वाहन चालविताना वेगाबरोबरच मन आणि भावनांना मुरड घालावी -सपोनि प्रवीण संपागे स्वेरीत ३२ व्या ‘रस्ते सुरक्षा अभियान २०२१’ बाबत मार्गदर्शन
पंढरपूर (संतोष हलकुडे) – ‘वाहतुकीचे नियम पाळताना सर्व नियम पाळणे आवश्यक आहे. वाहन चालवताना सीट बेल्ट लावणे अत्यंत गरजेचे आहे. याचा तोटा होणार नाही परंतु फायदा मात्र नक्कीच होतो. ट्राफिक हवालदार दिसल्यानंतर ट्रिपल सीट दुचाकी चालविताना पाठीमागे बसलेला मित्र वाहन थांबविण्यापुर्वीच उडी मारतो. हे देखील एक अपघाताचे कारण आहे. वाहन चालकांनी हे लक्षात ठेवा की […]
अंधश्रद्धेच्या नावाखाली 2 किलो सोनं पुरुन 25 लाख खर्च
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यातील मोहटादेवी देवस्थानच्या तत्कालीन विश्वस्थ मंडळ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंधश्रद्धेच्या नावाखाली मोहटादेवी मंदिरात सुमारे 2 किलो सोने पुरून त्यावर मंत्रोपचारासाठी 25 लाख रुपये खर्च केल्याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 3 फेब्रुवारी रोजी औरंगाबाद उच्च न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश […]
पकडलेला ट्रॅक्टर वाळू माफियाने पळवला, सांगोल्यात रस्त्यावर उडाला हाहाकार!
पंढरपूर : सांगोल्यात पोलिसांनी पकडून एसटी स्टँडच्या गोडावूनमध्ये ठेवलेला ट्रॅक्टर वाळू माफियांच्या माणसाने पळवण्याचा प्रयत्न केला. ट्रॅक्टर पळवून नेत असताना न आवरल्याने सांगोल्याच्या मुख्य रस्त्यावर बराच वेळ गोंधळ झाल्याचं अनुभवायला मिळाले. पोलिसांनी आता या अज्ञात माफियांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला असला तरी या ट्रॅक्टरच्या धडकेमुळे 3 ते 4 दुकाने व एका मोटारसायकलचं नुकसान झालं […]
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणेच्या सहाय्यक सचिव- मा.सौ.संगीता शिंदे मॅडम व सोलापूर जिल्हा विभाग प्रमुख – मा.श्री.राजेश जाधव साहेब” यांची “कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर या प्रशालेस सदिच्छा भेट”
शुक्रवार, दि.०५.०२.२०२१ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर या प्रशालेस महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांचे मा.सौ.संगीता शिंदे मॅडम (सहाय्यक सचिव) व मा.श्री.राजेश जावीर (सोलापूर जिल्हा विभाग प्रमुख) यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटीवेळी श्री नाळे साहेब (गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती, पंढरपूर), प्रशालेच्या प्राचार्या, सौ.शैला कर्णेकर, रजिस्ट्रार श्री गणेश वाळके आदी मान्यवर उपस्थित होते. […]
पंढरपुरात कॉंग्रेस ओबीसी विभागाच्यावतीने महागाईविरोधात आंदोलन
पंढरपूर – देशात सतत पेट्रोल- डिझेल त्याचबरोबर गॅसच्या वाढत असलेल्या दरामुळे सर्वसामान्य जनता हैराण झालेली आहे. केंद्र सरकार कायमच उद्योगपती यांच्या हिताचे निर्णय घेण्यात व्यस्त असल्याने सर्वसामान्य जनता मात्र त्यांच्या निर्णयामुळे भरडली जात आहे याचा निषेध म्हणून आज पंढरपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये पंढरपूर शहर कॉंग्रेस ओबीसी विभाग यांच्यावतीने आंदोलन करण्यात आले व केंद्र […]
धक्कादायक! अधिकृत सेंटरमधूनच दिले जात होते बोगस आधारकार्ड
भारतीय नागरिक असल्याचा पुरावा म्हणून अनेक ओळखपत्रांपैकी एक असलेले आधारकार्ड अधिकृत सेंटरमधूनच बोगस दिले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने याप्रकरणी दोघांना अटक केली असून, नेपाळच्या नागरिकासह अनेकांना या दोघांनी बोगस कागदपत्रांवर आधारकार्ड बनवून दिल्याचे समोर आले आहे. बोरिवली पश्चिमेकडील कॅनरा बँकेत आधारकार्ड नोंदणीची सेवा पुरविणाऱ्या कंपनीने त्यांचे अधिकृत सेंटर सुरू केले आहे. बँकेचे […]
पठ्ठ्यांनी एसटी आगारातून बसच पळवली
लातूर : लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातल्या औराद शहाजनी इथे एसटी बस पळवल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आलाय. गावाला जाण्यासाठी रात्री उशिरा बस नसल्यामुळे काही अज्ञात तरुणांनी दारूच्या नशेत औरादच्या एसटी बसस्थानकात उभी असलेली बस पळविली. यावेळी दोन ठिकाणी बस आपटून २५ हजारांचं नुकसानही झालं. निलंगा आगाराची निलंगा-औराद शहाजनी ही एसटी बस स्थानकात लावून बस चालक विश्रांतीगृहात झोपण्यासाठी […]
पंढरीतील पारंपारिक तुळशीमाळ बनवणार्या कलाकार तरुणाची नि:स्सीम रामभक्ती! राम मंदिरासाठी दिली देणगी!
पंढरपूर (प्रतिनिधी):- पंढरपूरातील काशी कापडी समाज हा पारंपारिक तुळशीमाळा बनवणारा समाज आहे. तुळशीमाळ बनवण्यात या समाजातील तरुण पिढीही अव्वल ठरलेली आहे. पिढीजात कलागुण जपत समाजातील सुसंस्कृत आणि ईश्वरभक्तीचा वारसा जपलेल्या याच समाजातील तुळशीमाळ बनवणारे तरुण सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास उपळकर यांनी श्री राम मंदिराला 3333 रूपयांची देणगी देत आपल्या नि:स्सीम श्रीराम भक्तीची प्रचिती करुन दिली. कोरानाच्या […]
शिवसेना महिला आघाडीच्या वतीने सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात -शैला गोडसे
पक्षप्रमुख उध्दवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आज पंढरपूर शहरामध्ये शिवसेना महिला आघाडीच्या वतीने भक्ती मा्र्ग येथील महिला आघाडी संर्पक कार्यालयात सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे या महिला आघाडी सदस्य नोंदणी अभियानाअंतर्गत जास्तीत जास्त महिलाचा सहभाग नोदवून महिला आघाडी संघटन मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे जास्तीत जास्त महिला सद्स्यांची नोंदणी करण्यात येणार आहे..तसेच संघटनेच्या […]