ताज्याघडामोडी

पंढरीतील पारंपारिक तुळशीमाळ बनवणार्‍या कलाकार तरुणाची नि:स्सीम रामभक्ती! राम मंदिरासाठी दिली देणगी!

पंढरपूर (प्रतिनिधी):- पंढरपूरातील काशी कापडी समाज हा पारंपारिक तुळशीमाळा बनवणारा समाज आहे. तुळशीमाळ बनवण्यात या समाजातील तरुण पिढीही अव्वल ठरलेली आहे. पिढीजात कलागुण जपत समाजातील सुसंस्कृत आणि ईश्‍वरभक्तीचा वारसा जपलेल्या याच समाजातील तुळशीमाळ बनवणारे तरुण सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास उपळकर यांनी श्री राम मंदिराला 3333 रूपयांची देणगी देत आपल्या नि:स्सीम श्रीराम भक्तीची प्रचिती करुन दिली.

कोरानाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरातील विठ्ठल मंदिर बंद होते. संपूर्ण दुकानदारी बंद होती. तरीसुध्दा आयोध्येत श्रीरामाचे भव्य मंदिर उभारले जातेय याचा अभिमान आणि श्रध्दा मनात ओतप्रोत भरलेल्या श्रीनिवास उपळकर यांनी राम मंदिराच्या बांधकामासाठी फुल ना फुलाची पाकळी असे आपले योगदान असावे या भावनेतून ही देणगी दिली आहे. त्यांच्या या कृतीचे श्रीराम भक्तांमधुन कौतुक होत आहे.

यावेळी ह.भ.प राणा महाराज वासकर, महर्षी वाल्मिकी संघ संस्थापक गणेश अंकुशराव, रविंद्र साळे, सारंग बडोदकर, मनोज वाडेकर, स्वप्निल वाघमारे, पप्पू काका सोनार आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *