ताज्याघडामोडी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणेच्या सहाय्यक सचिव- मा.सौ.संगीता शिंदे मॅडम व सोलापूर जिल्हा विभाग प्रमुख – मा.श्री.राजेश जाधव साहेब” यांची “कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर या प्रशालेस सदिच्छा भेट”

शुक्रवार, दि.०५.०२.२०२१ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर या प्रशालेस महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांचे मा.सौ.संगीता शिंदे मॅडम (सहाय्यक सचिव) व मा.श्री.राजेश जावीर (सोलापूर जिल्हा विभाग प्रमुख) यांनी सदिच्छा भेट दिली.
या भेटीवेळी श्री नाळे साहेब (गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती, पंढरपूर), प्रशालेच्या प्राचार्या, सौ.शैला कर्णेकर, रजिस्ट्रार श्री गणेश वाळके आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी मा.सौ.शिंदे मॅडम व श्री जावीर सर यांनी प्रशालेची व प्रशालेच्या परिसराची पाहणी करुन प्राचार्या व रजिस्ट्रार यांचे कौतुक केले. त्यांना ही शाळेची इमारत व परिसर खुपच आवडला.
भेटी दरम्यान पाहुण्यांचा सत्कार प्रशालेच्या प्राचार्या सौ.शैला कर्णेकर यांनी केला व आपण वेळात-वेळ काढून आमचे प्रशालेस ही सदिच्छा भेट दिली त्याबद्दल पाहुण्यांचे आभार मानले व आम्ही सर्व व आमचा सर्व स्टाफ उपकृत झाल्याचे सांगितले.
प्रमुख पाहुण्यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना “एक विद्यार्थी-एक बेंच” ही कल्पना आमलात आणल्याबद्दल प्रशालेच्या व्यवस्थापनाचे व प्राचार्यांचे फारच कौतुक केले. या कोरोना काळात केलेल्या या उपक्रमाबद्दल त्यांना सर्वांचा अभिमान वाटला.
यावेळी पाहुण्यांनी स्टाफबरोबर फोटोसेशन केले व सर्वांचे मनःपुर्वक आभार मानले. याप्रसंगी प्रशालेचा सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर स्टाफ उपस्थीत होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *