ताज्याघडामोडी

सुरेश (भाऊसाहेब) अंबुरे (सर) यांची भाजपच्या जिल्हाउपाध्यक्ष पदी निवड

पंढरपूर:   बार्डी-करकंब येथील धनश्री उद्योग समूहाचे अध्यक्ष सुरेश (भाऊसाहेब) अंबुरे (सर) यांची भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाउपाध्यक्ष पदी निवड झाली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगोला येथे झालेल्या बैठकीत निवड केल्याचे जाहीर केले. सुरेश अंबुरे यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीत भाजपचे प्रभावीपणे कार्य केले आहे.पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्या चांगल्या पद्धतीने पार पाडल्या आहेत. त्यांच्या कौशल्याची दखल घेऊन त्यांच्यावरती पक्षकार्याची जबाबदारी सोपविली आहे. यावेळी पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे, लोकप्रिय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, आमदार प्रशांत परिचारक, रणजितसिंह मोहिते पाटील, राजेंद्र राऊत, राम सातपुते, सचिन कल्याणशेट्टी, जिल्हापरिषदेचे अर्थ-बांधकाम सभापती विजयराज डोंगरे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *