गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

बर्थडेला केक कट केला अन् रात्री आयुष्य संपवलं, मावशी म्हणते – आईच्या प्रियकराने हत्या केली

एका १५ वर्षांच्या मुलीने आपल्या वाढदिवशी मैत्रिणींसोबत शाळेत मौजमजा केली. घरी येऊन केक कट केला आणि त्यानंतर तिने रात्री गळफास घेत आपलं आयुष्य संपवल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. बिहारमधील गोपालगंज येथे ही घटना घडली. याप्रकरणी नातेवाईकांवर आईच्या प्रियकरावर हत्येचा आरोप केला आहे. तर, संशयित आरोपी घटनेनंतर फरार झाला आहे. सध्या पोलिस त्याचा तपास घेत आहेत. […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

शेतमजुराची शेतात महिलेशी भेट, प्रेमसंबंधानंतर लग्नही केलं, अचानक पतीच्या प्रेयसीची एन्ट्री अन्…

नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात आरोपी पतीने प्रेयसीच्या नादात आपल्याच पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली. पत्नीची हत्या करणाऱ्या पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपी पतीने आपल्या प्रेयसीच्या मदतीने पत्नी दिव्या यादवची हत्या केली. रामटेक जवळील खिंडसी रोडवरील बोरीच्या जंगलात हे हत्याकांड घडले. १८ ऑक्टोबर रोजी स्कार्फच्या सहाय्याने तिचा गळा आवळून खून केला आणि नंतर दगडाने […]

ताज्याघडामोडी

सोलापूर जिल्ह्यात प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या बैठकीत सूचना    सोलापूर, दिनांक 26 (जिमाका):- भारतीय अर्थव्यवस्थेत अनेक कारागीर यांचा समावेश होतो. या पारंपारिक कारागीरांना विश्वकर्मा म्हणून संबोधले जाते. तरी जिल्ह्यातील अठरा पारंपारिक व्यवसायातील लाभार्थ्यांची नोंदणी करून त्या लाभार्थ्यांचे सरपंचामार्फत व्हेरिफिकेशन करून पात्र लाभार्थ्यांना लाभ देऊन या प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार […]

ताज्याघडामोडी

मनोज जरांगेंच्या मुसक्या बांधा, तात्काळ अटक करा; गाडीच्या काचा फुटल्यानंतर गुणरत्न सदावर्ते संतापले

मराठा आरक्षणाविरोधात सातत्याने ठाम भूमिका घेणारे गुणरत्न सदावर्ते यांच्या अलिशान गाडीची गुरुवारी सकाळी तोडफोड करण्यात आली. या घटनेनंतर संतप्त झालेल्या गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांना तातडीने अटक करण्याची मागणी केली. तसेच हेच का तुमचे शांततापूर्ण मराठा आंदोलन, असा रोखठोक सवाल मनोज जरांगे-पाटील यांना विचारला. गुणरत्न सदावर्ते मुंबईतल्या हिंदमाता परिसरातल्या क्रिस्टल टॉवर्स या १६ […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर सिंहगड मध्ये “डेटा अ‍ॅनालिटिक्स” या विषयावर व्याख्यान संपन्न

एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये शनिवार दिनांक २१ ऑक्टोबर २०२३ रोजी डेटा अ‍ॅनालिटिक्स या विषयावर मुंबई येथील लाॅजिलेक कंपनीचे को फौंडर अंकित पाटे, विवेक काळेकर आणि मुकेश चौधरी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हे व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर यांनी दिली. सिंहगड इंजिनिअरिंग […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

गुरे चरण्यावरून दोन शेतकऱ्यांमध्ये वाद; समोर येताच पुन्हा जुंपली, अन् घडलं धक्कादायक कृत्य

गुरे चरण्यावरून जुना वाद उफाळून आल्याने डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना खार्डी येथे घडली आहे. याप्रकरणी आरोपी विरोधात केळवे सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पालघर तालुक्यातील खार्डी गावातील दूध व्यवसाय करणाऱ्या वसंत सखाराम भोईर (५३) आणि प्रकाश यशवंत घरत (४५) या दोन शेतकऱ्यात […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पतीच्या मनात पत्नीबद्दल संशय; जीवे मारण्याचा कट रचला, घाटात नेऊन गळा आवळला, मात्र…

जिल्ह्यातील राजूर घाट गुन्हेगारीचा घाट होत चालला आहे. अनेकदा राजूरघाटात चित्तथरारक प्रसंग घडून गेले आहेत. कथिक सामूहिक अत्याचाराच्या घटनेनंतर घाटातील देवी मंदिराच्या परिसरात पोलीस चौकी लावण्यात आली आहे. या ठिकाणच्या पोलीस बंदोबस्तामुळे काल २३ ऑक्टोबरच्या सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास एकाचा कट रोखला गेला. या घटनेतील आरोपी तसेच फिर्यादी मूळ अकोला जिल्ह्यातील असून आरोपीने पत्नीला संपवण्याचा […]

ताज्याघडामोडी

दसरा मेळाव्याला निघालेल्या शिंदे गटाच्या गाडीला अपघात; एकाचा मृत्यू तर तिघेजण जखमी

आज मुंबईत होणा-या दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईकडे येण्यासाठी निघाले आहेत. दरम्यान, सांगलीतून मेळाव्यासाठी येत असलेल्या शिंदे गटातील कार्यकर्त्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू तर तिघेजण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेली माहिती अशी की, रत्नागिरी-नागपूर महामार्गावर कवठेमहांकाळ तालुक्यातून जात असताना एका ट्रकने पाठीमागून कारला धडक दिल्याने हा अपघात झाला. […]

ताज्याघडामोडी

कर्मयोगी इन्स्टिट्यूट मध्ये “आविष्कार २०२3” उत्साहात संपन्न

अभियांत्रिकीचे ज्ञान व बदलते तंत्रज्ञान यांची योग्य सांगड घालून समाजाभिमुख संशोधन करण्यासाठी प्रकल्प तयार करणे व ते स्पर्धेमध्ये सादर करणे खूप महत्त्वाचे आहे.  अश्या प्रकल्प स्पर्धेतून च नवीन मोठे शोध जन्माला येतील असा विश्वास महाविद्यालयाचे प्रचार्य डॉ एस पी पाटील यांनी व्यक्त केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटी लोणेरे अंतर्गत महाविद्यालयीन स्तरावरील “आविष्कार २०२3”  या […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

सख्खा भाऊ बनला पक्का वैरी, नोकरीसाठी बहिणींची माया विसरला, महिनाभर प्लॅनिंग, थंड डोक्याने बहिणींना संपवलं

अनुकंपावर नोकरी मिळविण्यासाठी भावाने सूप मध्ये दोन सख्या बहिणींना विषारी औषध देऊन त्यांची हत्या केली असल्याची घटना अलिबाग तालुक्यातील चौळ भोवाळे येथे घडली असल्याचे समोर आले असून यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.१६ ऑक्टोबर रोजी अलिबाग तालक्यातील चौल भोवाळे गावात जेवणातून विषबाधा झाली असल्याने सोनाली मोहिते (३४) व स्नेहल मोहिते (३०) या दोन बहिणींनी अलिबाग येथील […]