ताज्याघडामोडी

कर्मयोगी इन्स्टिट्यूट मध्ये “आविष्कार २०२3” उत्साहात संपन्न

अभियांत्रिकीचे ज्ञान व बदलते तंत्रज्ञान यांची योग्य सांगड घालून समाजाभिमुख संशोधन करण्यासाठी प्रकल्प तयार करणे व ते स्पर्धेमध्ये सादर करणे खूप महत्त्वाचे आहे. 
अश्या प्रकल्प स्पर्धेतून च नवीन मोठे शोध जन्माला येतील असा विश्वास महाविद्यालयाचे प्रचार्य डॉ एस पी पाटील यांनी व्यक्त केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटी लोणेरे अंतर्गत महाविद्यालयीन स्तरावरील “आविष्कार २०२3”  या प्रकल्प स्पर्धेचे आयोजन दि. २१ ऑक्टोबर २०२३ रोजी कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये केले होते. या स्पर्धेच्या उद्घाटन ते बोलत होते.
याप्रसंगी बोलताना आविष्कार 2023-24 चे संयोजक व संशोधन अधिष्ठाता डॉ अभय उत्पात म्हणाले की या प्रकल्प स्पर्धेला विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला असून सुमारे दीडशेहून अधिक विद्यार्थ्यांनी आपले प्रकल्प सादर केले. या स्पर्धेचा फायदा भविष्यामध्ये  विद्यार्थ्यांना निश्चितच  होणार आहे. 
या स्पर्धेमध्ये इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी,मेडिकल अँड फार्मसी, फाईन आर्टस, लॉ, मॅनेजमेंट, प्युअर सायन्स, अग्रिकल्चर आदी विभागातील प्रकल्प विद्यार्थ्यांनी सादर केले. या प्रत्येक विभागातून दोन स्पर्धकांची विभाग स्तरावर होणाऱ्या प्रकल्प स्पर्धेसाठी निवड केली जाणार आहे. या स्पर्धेसाठी डॉ अभय उत्पात, डॉ एस व्ही एकलारकर, प्रा. जे एल मुडेगावकर, प्रा. अनिल बाबर, प्रा. एन जी तिवारी, प्रा. अभिनंदन देशमाने, प्रा. एस एम लंबे, प्रा. आशिष जोशी आदींनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
सदरच्या स्पर्धेसाठी श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे चेअरमन रोहन परिचारक यांनी सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेसाठी महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए बी कणसे, रजिस्ट्रार जी डी वाळके, उप प्राचार्य प्रा. जगदीश मुडेगावकर, संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. आशिष जोशी,  विभागप्रमुख प्रा. अनिल बाबर, प्रा. राहुल पांचाळ, प्रा. एस एम लंबे, प्रा. दीपक भोसले, प्रा. अभिनंदन देशमाने व सर्व प्राध्यापक उपस्थित होते. सदर ची स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रा. एम एम गुंड, प्रा. रमेश हलचेरिकर, प्रा.आर जे भोसले, प्रा. ए म सुतार आदी प्राध्यापकांचे विशेष सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *