गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

शेतमजुराची शेतात महिलेशी भेट, प्रेमसंबंधानंतर लग्नही केलं, अचानक पतीच्या प्रेयसीची एन्ट्री अन्…

नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात आरोपी पतीने प्रेयसीच्या नादात आपल्याच पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली. पत्नीची हत्या करणाऱ्या पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपी पतीने आपल्या प्रेयसीच्या मदतीने पत्नी दिव्या यादवची हत्या केली. रामटेक जवळील खिंडसी रोडवरील बोरीच्या जंगलात हे हत्याकांड घडले. १८ ऑक्टोबर रोजी स्कार्फच्या सहाय्याने तिचा गळा आवळून खून केला आणि नंतर दगडाने ठेचून मृताचा चेहरा विद्रूप करण्यात आला.

सुरुवातीला या प्रकरणी कन्हान पोलीस ठाण्यात बेपत्ता व्यक्तीची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर रामटेक पोलिसांना मृतदेह सापडल्यानंतर याप्रकरणी कन्हान पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली. मृतदेहाची ओळख पटत नसल्याने या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छडा लावत दिव्याचा पती छोटूलाल आणि त्याच्या प्रेयसीला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितनुसार छोटूलाल यादव हा शेतमजूर असून वर्षभरापूर्वी त्याची दिव्या तारामशी भेट झाली. एकाच शेतात काम करत असताना दोघांनी एकमेकांचा मोबाईल नंबर घेतला. दोघांची जवळीक वाढली आणि प्रेमसंबंध निर्माण झाले. यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दिव्या आणि छोटूलाल यांचे लग्न ऑगस्ट महिन्यात झाले होते. लग्नानंतर दोघांचे वैवाहिक जीवन सुरू झाले. दरम्यान, छोटूलालची दुसरी प्रेयसी त्यांच्या घरी आली आणि तिने तिथे गोंधळ घातला. त्यामुळे दिव्याला पतीच्या प्रेयसीची माहिती मिळाली. त्यानंतर दिव्या आणि छोटूलालमध्ये वाद वाढले. तर दुसरीकडे छोटूलालची प्रेयसीने त्याच्या सोबत लग्न करण्याची तयारीही दाखवली.

१८ ऑक्टोबर रोजी छोटूलालने दिव्याला फिरायला नेण्याच्या बहाण्याने जंगलात नेले. दरम्यान, त्याची प्रेयसीही तेथे पोहोचली. दोघांनीही दिव्याच्या डोक्यात दगड घालून खून केला. मृतदेह जंगलात फेकून दिल्यानंतर दोघेही घरी आले. महिलेचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख ओमप्रकाश कोकाटे, राजीव करमलवार यांनी घटनास्थळी भेट दिली. तेथे एक स्कार्फ आणि पितळीची बांगडी सापडली. त्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने छडा लावत दिव्याचा पती छोटालाल आणि त्याचा प्रेयसीला अटक करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *