ताज्याघडामोडी

पंढरपूर शहर व तालुक्यातील भीमा नदीकाठच्या सर्व गावांमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पंढरपूर शहर व तालुक्यातील भीमा नदीकाठच्या सर्व गावांमधील नागरिकांना कळविण्यात येते की, वीर धरण व परिसरात संततधार पाऊस सुरू असल्याने धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी दि.14/09/2021 रोजी वीर धरणाच्या सांडव्यातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये वाढ करून पहाटे 4.00 वाजता 32459 Cusecs विसर्ग नीरा नदीमध्ये सुरू करण्यात आला आहे. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये बदल होऊ शकतो. यामुळे […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

खेडभोसे येथील तरुणाचा विष पाजून खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप

लग्नास नकार देत असल्याच्या कारणाने खेडभोसे येथील एका तरुणाचा विष पाजून खुनाचा प्रयत्न केल्याचा असल्याच्या प्रकरणातील ९ आरोपींचा अटकपूर्व जामीन येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम.बी.लंबे यांनी मंजूर केला आहे.  ११ जून २०२१ रोजी रात्री १० वाजता खेडभोसे येथील सोमनाथ रामचंद्र पवार या तरुणास जीवे मारण्याच्या उद्देशाने या प्रकरणातील आरोपी कालिदास साळूंखे,कांतीलाल साळूंखे,मधुकर चव्हाण,अंकुश पाटील,शिवाजी पवार,सिद्धेश्वर […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पंढरपूर शहरातून पुन्हा दोन मोटारसायलची चोरी

पंढरपूर शहरातील गर्दीच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या मोटारसायकली चोरटे हातोहात लंपास करत असल्याच्या घटना गेल्या काही महिन्यात वारंवार घडत असून आता पुन्हा ७ व ८ सप्टेंबर रोजी शहरातून दोन मोटर सायकली चोरटयांनी लंपास केल्या आहेत.या प्रकरणी दोन्ही मोटार सायकलच्या मालकांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या बाबत दाखल फिर्यादीनुसार मकरंद पुरुषोत्तम कुलकर्णी रा.गोविन्दपुरा पंढरपुर यांचे […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पंढरपूरात मॉर्निग वॉक वरून परतणाऱ्या डॉक्टर पत्नीचे सव्वालाखाचे मंगळसूत्र लंपास

पंढरपूर शहरात गेल्या काही दिवसात सातत्याने चोरीच्या घटना घडत असल्याचे दिसून येते.मोटार सायकल चोरीच्या घटना तर नित्याची बाब झाली असून अनेकवेळा भरदिवसा चोरटे आपला कार्यभाग साधत असल्याचेही दिसून येते.शहरातील धनिकांची वसाहत समजल्या जाणाऱ्या परदेशी नगर सारख्या काही उपनगरात घरफोडी व छोट्या मोठ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.आज दिनांक ८ सप्टेंबर रोजी भरदिवसा वयोवृद्ध डॉक्टर आपल्या पत्नीसह […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

५ होड्यातून होत होता अवैध वाळू उपसा १ सापडली ४ होड्या पळून गेल्या

  पंढरपूर तालुक्यातील आंबे गावच्या हद्दीतून भिमानदीच्या पात्रातून करण्यात येणारा अवैध वाळू उपसा आणि वाहतूक हा पंढरपूर तालुक्यात कायम चर्चेचा विषय ठरला आहे.या ठिकाणाहून करण्यात येणाऱ्या अवैध वाळू उपशावर व वाहतुकीवर पंढरपुर तालुका पोलिसांकडून वारंवार कारवाई केली तरी पुन्हा येथून अवैध वाळू उपसा करणाऱ्याचे उधोग काही थांबत नसल्याचेच वारंवार होणाऱ्या पोलीस कारवाईमुळे दिसून येते.जिल्ह्यात वाळूचे […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

तालुक्यातील पाच गावांतील निर्बंध शिथिल

तालुक्यातील ग्रामीण भागातील कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी  आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.  कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुक्यातील पाच गावांमध्ये  नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे तंतोतत पालन केले आहे. या गावांतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाल्याने पाच गावांमध्ये निर्बंध शिथील करण्यात आले असल्याची माहिती प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिली. तालुक्यातील ग्रामीण कोरोना संसर्गाचे वाढते प्रमाण लक्षात घेता […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

वाळू चोरीची वाट अडवणाऱ्या शेतकऱ्यास ग्रामपंचायतीसमोर बोलवून बेदम मारहाण

पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात १० जणांविरोधात गुन्हा दाखल  नदीकाठी शेती असणारा शेतकरी म्हणजे मळई रानाचा नशीबवान मालक म्हणून ओळखला जातो.पण पंढरपूर तालुक्यातील भीमा नदीकाठावरील काही गावांमध्ये वाळू चोरांनी घातलेला हैदोस नदीकाठची शेती असलेल्या अनेक शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरला असून अनेक गावातील मुजोर वाळूचोर वाळूची वाहने नदीपात्रातून वर काढण्यासाठी बेधडकपणे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातून रस्ता काढत असल्याचे अनेक वेळा […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

शेगाव दुमाला परिसरात वाळू चोरीसाठी ५ मोटार सायकलचा वापर

पंढरपूर तालुक्यातील भीमा नदीकाठावरून सात्यताने होणारा वाळू उपसा हि पोलीस प्रशासनाची डोकेदुखी बनली असून वारंवार कारवाई करून देखील वाळूचोर काही जुमानत नाहीत असेच म्हणावे लागेल.आठच दिवसापूर्वी शेगाव दुमाला येथेच कारवाई करत तालुका पोलिसांनी दोन वाहने ताब्यात घेतली होती मात्र त्या वाहनाचे मालक कोण याची माहिती अजून तरी मिळू शकली नाही.चारचाकी वाहनातून वाळू चोरी करण्यास अडचण […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

टाकळी रस्त्यावरील घरासमोरून हिरो स्प्लेंडरची चोरी

गेल्या काही दिवसात पंढरपूर शहर व आजूबाजूच्या उपनगरात मोटार सायकल चोरीच्या घटना वारंवार घडत असल्याने एसटी मध्ये वाहक असलेल्या आनंद नगर टाकळी येथील मिलिंद एकनाथ महामुनी यांनी आपल्या हिरो स्प्लेंडरला जिपीएस सिस्टीम बसवून घेतली होती. दि. 24/08/2021 रोजी रात्रौ 11/30 वा. चे सुमारास त्यांनी आपली स्प्लेंडर MH 13 DB 4620 हि दुकाची घरासमोर हॅन्डल लॉक करून […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर तालुक्यातील 21 गावांत कडक लॉकडाऊन

प्रांताधिकारी गजानन गुरव यांची माहिती पंढरपूर, दि. 25 :- तालुक्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. यासाठी विशेष मोहीम राबवून कोरोना बाधितांचा शोध घेतला जाणार आहे. कोरोनाबाधितांची संख्या जास्त असणाऱ्या 21 गावांत 14 दिवस कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. तसेच ज्या गावांत 10 किंवा 10 पेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण […]