गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

शेगाव दुमाला परिसरात वाळू चोरीसाठी ५ मोटार सायकलचा वापर

पंढरपूर तालुक्यातील भीमा नदीकाठावरून सात्यताने होणारा वाळू उपसा हि पोलीस प्रशासनाची डोकेदुखी बनली असून वारंवार कारवाई करून देखील वाळूचोर काही जुमानत नाहीत असेच म्हणावे लागेल.आठच दिवसापूर्वी शेगाव दुमाला येथेच कारवाई करत तालुका पोलिसांनी दोन वाहने ताब्यात घेतली होती मात्र त्या वाहनाचे मालक कोण याची माहिती अजून तरी मिळू शकली नाही.चारचाकी वाहनातून वाळू चोरी करण्यास अडचण आल्यास वाळू चोर अनेक ठिकाणी दुचाकींचा वापर करत असल्याचे दिसून येते.असाच प्रकार शनिवार दिनांक २८ ऑगस्ट रोजी केलेल्या कारवाईत उघड झाला आहे.

या प्रकरणी पोहेक/ 104 परशुराम तात्याराम शिंदे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार मौजे शेगावदुमाला ता पंढरपूर येथे भिमा नदीपात्रातून मोटारसायकलद्वारे अवैधरित्या वाळु काढून दुचाकीवर भरुन वाहतूक करीत आहेत अशी बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी खात्री करणेकरीता व कारवाईकरीता आम्ही खाजगी मोटारसायकलीने गेले असता पो.ना. भोसले,पो.ना. ताटे,पो.हे.क.शिंदे हे सदर ठिकाणी गेले असता मौजे शेगांवदुमाला ता पंढरपूर येथील स्मशानभुमीपासून भिमा नदीपात्राचे कडेचे रोडने जात असताना समोरुन पाच मोटारसायकलवर पाठीमागे ठिक्यामध्ये वाळु भरुन येत असताना दिसले.पोलीस आल्याचे दिसताच दोन मोटार सायकलस्वार दुचाकीसह पळून गेले तर तिघांनी आपल्या मोटारसायकली जागीच टाकून पळ काढला.त्यापैकी एकाच पाठलाग करून पकडण्यास पोलिसांना यश आले.

या कारवाईत काळया लाल रंगाची होंडा कंपनीची शाईन दुचाकी एम.एच. 13 बी.जे.6119 व मागील ठिक्यात 06 पाटया वाळु, एक काळया गुलाबी रंगाची हिरो कंपनीची स्प्लेंडर दुचाकी नं. एम.एच. 13 एफ. 4923 व मागील ठिक्यात 06 पाटया वाळु व एक काळया गुलाबी रंगाची हिरो कंपनीची स्प्लेंडर दुचाकी तिचा नं.एम.एच. 13 ए.एल. 1545 असा असून या प्रकरणी प्रशांत गौतम इंगळे रा.शेगावदुमाला ता.पंढरपूर यांच्यासह अज्ञात मोटारसायकल चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गेल्या काही दिवसात पंढरपुर शहर व तालुक्यातून मोटारसायकल चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे या कारवाईत ताब्यात घेण्यात आलेल्या मोटारसायकलीचे नंबरप्लेटवरील नंबर आणि प्रत्यक्ष मालकी याची खातरजमा होणे गरजेचे झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *