गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

खेडभोसे येथील तरुणाचा विष पाजून खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप

लग्नास नकार देत असल्याच्या कारणाने खेडभोसे येथील एका तरुणाचा विष पाजून खुनाचा प्रयत्न केल्याचा असल्याच्या प्रकरणातील ९ आरोपींचा अटकपूर्व जामीन येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम.बी.लंबे यांनी मंजूर केला आहे.

 ११ जून २०२१ रोजी रात्री १० वाजता खेडभोसे येथील सोमनाथ रामचंद्र पवार या तरुणास जीवे मारण्याच्या उद्देशाने या प्रकरणातील आरोपी कालिदास साळूंखे,कांतीलाल साळूंखे,मधुकर चव्हाण,अंकुश पाटील,शिवाजी पवार,सिद्धेश्वर पवार यांच्यासह ९ इसमांनी मयत सोमनाथ यास जीवे मारण्याच्या उद्देशाने ५ जणांनी हातपाय दाबून धरले व इतर चौघांनी मयतास विषारी औषध पाजले.या प्रकरणी करकंब पोलिसांनी दखल न घेतल्याने न्यायालयात दाद मागण्यात आली होती.त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते.दरम्यान या प्रकरणातील आरोपींनी ऍड.पांडुरंग चवरे व ऍड.कुमार बाबर यांच्या मार्फत न्यायालयात अटकपूर्व जमिनीसाठी अर्ज दाखल केला होता.समोर आलेल्या सर्व बाबींचे अवलोकन करून व वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने सर्व ९ आरोपीना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *