

पंढरपूर शहर व तालुक्यातील भीमा नदीकाठच्या सर्व गावांमधील नागरिकांना कळविण्यात येते की, वीर धरण व परिसरात संततधार पाऊस सुरू असल्याने धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी दि.14/09/2021 रोजी वीर धरणाच्या सांडव्यातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये वाढ करून पहाटे 4.00 वाजता 32459 Cusecs विसर्ग नीरा नदीमध्ये सुरू करण्यात आला आहे. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये बदल होऊ शकतो. यामुळे भीमा नदीच्या पाणीपातळीत देखील मोठी वाढ होणार आहे. भीमा नदीकाठच्या गावांमधील सर्वांनी काळजी घ्यावी तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये. सर्वांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे
सुशीलकुमार बेल्हेकर
तहसीलदार तथा अध्यक्ष तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, पंढरपूर