मुंबई, 23 एप्रिल : ‘अजित पवार जनतेच्या, जनप्रतिनिधींच्या नेटवर्कमध्ये राहणारा कार्यकर्ता आहे. न्यूज चॅनलच्या पडद्यावर दिसण्यासाठी अभिनय करणाऱ्या, खोट्या प्रसिद्धीसाठी धडपडणाऱ्या नेत्यांपैकी मी नाही. दररोज काहीतरी बरळल्याशिवाय ज्यांचे चेहरे टीव्हीवर दिसू शकत नाहीत, अशी मंडळी अलिकडे माझ्यावर दररोज बिनबुडाचे आरोप करत आहेत,’ असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप नेत्यांवर जोरदार पलटवार केला आहे. […]
Tag: #ajitpawar
नोंदणीकृत फेरीवाल्यांना लवकरच मिळणार राज्य शासनाकडून दीड हजराची आर्थिक मदत
राज्यातील 25 लाख नोंदणीकृत घरेलू कामगारांसाठी 375 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. राज्यातील 5 लाख नोंदणीकृत फेरीवाल्यांना प्रत्येकी दीड हजार रुपयांप्रमाणे 75 कोटी रुपयांची मदत देण्यात येणार आहे. 12 लाख परवानाधारक रिक्षाचालकांना प्रत्येकी दीड हजार रुपयांप्रमाणे 180 कोटी रुपये मदत देण्यात येणार आहे.ही मदत देतांना सायकल रिक्षाचालकांचाही विचार करण्यात आला आहे. आदिवासी विभागांतर्गत खावटी […]
अजित पवार यांची मोठी घोषणा वीज कनेक्शन तोडण्यास स्थगिती
करोना काळात पाठवण्यात आलेल्या वाढीव वीजबिलांच्या मुद्द्यावरून सभागृहात आज गोंधळ उडाला. विधिमंडळ अधिवेशनाच्या कामकाजाला सुरूवात झाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नोत्तराचा तास तहकूब करून वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावर चर्चा घेण्यात यावी, अशी मागणी केली. त्यावरून भाजपा आक्रमक झाली. सभागृहात गोंधळ सुरू झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यस्थी करत वीज तोडणी मोहिमेला स्थगिती देत असल्याची […]
भाजप कार्यकर्त्यांकडून अजित पवारांची गाडी अडवण्याचा प्रयत्न;
नागपूरः नागपूरजवळील वाडी परिसरात भारतीय जनता युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गाडीचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यांवरुन भाजयुमोनं आक्रमक पवित्रा घेतला असून यावेळी थेट उपमुख्यमंत्र्यांनाच घेरलं आहे. राज्यात लॉकडाऊनच्या काळात जनतेला वाढीव वीज बील आले आहेत. वीज बिलातून ग्राहकांना सूट द्यावी या मागणीसाठी भाजपनं आक्रमक भूमिका घेतली आहे. शुक्रवारी भाजपनं वाढीव वीज बिलाच्या […]
अजित पवार यांच्या ”त्या” वक्तव्याने पंढरपूर तालुक्यातील पक्ष प्रवाशांना रेड सिग्नल
२०१९ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या उमेद्वारा विरोधात काम केलेला नेता मग तो कोण आहे याची फिकीर न करता त्याला पक्षात प्रवेश दिला जाणार नाही असे विधान राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते,उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.इंदापूर येथे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या तालुका कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना अजित पवार यांनी तुफान टोलेबाजी केली. […]