ताज्याघडामोडी

भाजप कार्यकर्त्यांकडून अजित पवारांची गाडी अडवण्याचा प्रयत्न;

नागपूरः नागपूरजवळील वाडी परिसरात भारतीय जनता युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गाडीचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यांवरुन भाजयुमोनं आक्रमक पवित्रा घेतला असून यावेळी थेट उपमुख्यमंत्र्यांनाच घेरलं आहे.

राज्यात लॉकडाऊनच्या काळात जनतेला वाढीव वीज बील आले आहेत. वीज बिलातून ग्राहकांना सूट द्यावी या मागणीसाठी भाजपनं आक्रमक भूमिका घेतली आहे. शुक्रवारी भाजपनं वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावर सरकारविरोधात आंदोलनही केलं होतं. त्यानंतर आज भाजयुमोनं थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गाडी अडवली आहे. यावेळी, चार जणांना अटक करण्यात आलयाची माहिती समोर येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *