शेळवे (ता.पंढरपूर) भारत सरकारच्या राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाकडून राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था तंबाखूमुक्त करण्यासाठी सुधारित मार्गदर्शक सुचनांची अंमलबजावणी करण्यात आली होती.त्या अनुषंगाने पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात सोलापूर जिल्ह्यात पाचवी तर पंढरपूर तालुक्यामध्ये प्रथम क्रमांकाची तंबाखूमुक्त शाळा ठरली आहे. आरोग्य विभाग भारत सरकारने पारित केलेले सुधारीत […]
Tag: #pandharpur
धाराशिव साखर कारखान्यावर ऊस तोडणी कामगाराच्या हस्ते ध्वजारोहण
समानतेचे तत्व शिकविणारा आपला प्रजासत्ताक दिन ऊस तोडणी कामगारच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला.!! धाराशिव साखर कारखाना लि.चोराखळी उस्म युनिट १, येथे अभिनव पद्धतीने प्रजासत्ताक दिन सोहळा साजरा करण्यात आला. सामान्यत: परिसरातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या हस्ते ध्वजारोहण करताना अत्यंत आनंद झाला. साखर कारखान्यासाठी ऊस तोडणी मजूर हा अती महत्त्वाचा असतो हा संदेश जसा दिला गेला तसेच सर्व […]
पंढरपूर कडे येत असताना राष्ट्रवादीच्या महिला नेत्यांचे गंठण लंपास
राष्ट्रवादी कॉग्रेस ओबीसी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा साधना रामचंद्र राऊत रा.भक्तिमार्ग पंढरपूर या रांझणी येथील आपल्या शेतातून पंढपुरातील घराकडे परतत असताना गोपाळपूर रस्त्यावरील कुंभार वीटभट्टी नजीक काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने हिसका मारून गळ्यातील १७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण खेचून गोपाळपूर दिशेने निघून गेला. या बाबत साधना राऊत यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून,एक अनोळखी मोटार सायकल चालवणारा […]
माहिती अधिकार अर्जदाराने विनयभंग केल्याची आरटीओ कार्यालयातील महिलेची तक्रार
ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कथित माहिती अधिकार कार्यकर्ता शरद धुमाळ याला वागळे इस्टेट पोलिसांनी अटक केली आहे. धुमाळ याने गेल्या पाच वर्षांत ‘आरटीओ’ कार्यालयात सुमारे १५०० माहिती अधिकाराचे अर्ज केले होते. अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांनी दिली. पीडित महिला ठाणे प्रादेशिक परिवहन […]
सरकोली येथील एकास भाउजीला दारू का पाजली म्हणून मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी
पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथील दत्तात्रय प्रल्हाद कपणे यांच्या घरचा गॅस सिलेंडर संपल्याने सिलेंडर आणण्यासाठी मोटारसायकल नसल्याने त्यांनी गावातीलच आपला मित्र संतोष अंकुश भोसले याची दुचाकी घेऊन त्याला सोबत घेऊन मंगळवेढा येथून सिलेंडर आणले खरे पण सदर मित्र दारू पिऊन घरी गेला. याची माहिती मिळताच संतोष अंकुश भोसले यांचे म्हेवणे किशोर वाघ हा सोबत मित्रांना घेऊन घरी […]
राम मंदिरासाठी पंढरपूरकर मोठा निधी देतील-आमदार प्रशांत परिचारक
देशातील जनतेचे जीवन प्रभुश्रीरामाशिवाय पुर्णच होवु शकत नाही. पंढरपूर अध्यात्मिक नगरी असून येथील नागरिक भाविक व दानशुर आहेत. त्यामुळे आयोध्येत बनत असलेल्या श्रीराम जन्मभुमि मंदिरास पंढरपूरकर मोठ्या प्रमाणात मदत करतील, अशी आशा आमदार प्रशांत परिचारक यांनी व्यक्त केली. श्रीराम जन्मभुमि तिर्थक्षेत्र मंदिर निर्माण करण्यासाठी निधी संकलन अभियानाच्या बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी बोलताना प्रांत संघचालक […]
शिरढोण ग्रामपंचायत निवडणुकीत भालके सर्मथक विजयी उमेदवारांचा भगीरथ भालके यांच्याहस्ते सत्कार
शिरडोन ग्रामपंचायतीवर भालके गटाची सत्ता नऊपैकी पाच जागा वरती विजय झाल्यानंतर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके यांच्यासमवेत सर्व प्रमुख कार्यकर्ते व विजय उमेदवार यांचा सत्कार करण्यात आला पुन्हा एकदा शिरडोन येथील ग्रामपंचायत अतिशय चुरशीने मतदान झाले होते एका बाजूला सर्व नेतेमंडळी असताना पुन्हा एकदा तरुण कार्यकर्त्यांनी सत्ता ताब्यात ठेवण्याचे काम तरुण कार्यकर्त्यांनी केलेले […]
पालखी मार्गांची कामे ३१ मार्च अखेर पूर्ण करा
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गांची कामे ३१ मार्च अखेर पूर्ण करण्यात यावी, असे निर्देश उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण […]
६ लाख ६६ हजारांच्या फसवणूक प्रकरणी राज पाटील यांच्यासह तिघांविरोधात फिर्याद दाखल
विवाह संस्थेमध्ये काम करून महिना १५ हजार रुपये मिळतील असे सांगत तसेच आंतरजातीय विवाहासाठी शासनाकडून ८० हजार रुपये मिळवून देतो,विजातीय विवाहासाठी ५० हजार मिळवून देतो आमची महाराष्र्ट् शासन संचलित नवरी मिळे नव-याला या नावाने सदरची संस्था असून सदर संस्था मार्फत आंतरजातिय विवाह झालेल्ा नवरी व नव-याला शासन अनुदान देते व त्याकरिता तुम्ही काही सदस्यांना आपल्या […]
टाकळी रोड जगदंबा नगर येथे घरफोडी
पंढरपूर शहरालगत असलेल्या लक्ष्मी टाकळी हद्दीतील जगदंबा नगर येथे घरमालक कुटूंबासह परगावी गेल्याची संधी साधत चोरटयांनी दरवाजाचे कडीकोयंडा कुलूप उचकटून सोन्याचांदीचे दागिने,चांदीच्या मूर्ती तसेच रोख रक्कम ५० हजार लंपास केली असून या घटनेमुळे या परिसरात खळबळ उडाली आहे.या बाबत सोमनाथ देठे रा.लक्ष्मी टाकळी यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली […]