ताज्याघडामोडी

राम मंदिरासाठी पंढरपूरकर मोठा निधी देतील-आमदार प्रशांत परिचारक

देशातील जनतेचे जीवन प्रभुश्रीरामाशिवाय पुर्णच होवु शकत नाही. पंढरपूर अध्यात्मिक नगरी असून येथील नागरिक भाविक व दानशुर आहेत. त्यामुळे आयोध्येत बनत असलेल्या श्रीराम जन्मभुमि मंदिरास पंढरपूरकर मोठ्या प्रमाणात मदत करतील, अशी आशा आमदार प्रशांत परिचारक यांनी व्यक्त केली. श्रीराम जन्मभुमि तिर्थक्षेत्र मंदिर निर्माण करण्यासाठी निधी संकलन अभियानाच्या बैठकीत ते बोलत होते.

याप्रसंगी बोलताना प्रांत संघचालक सुरेशनाना जाधव यांनी राम जन्मभुमि लढ्याचा इतिहास सांगितला. ते म्हणाले, 500 वर्षापेक्षा जास्त काळ श्रीराम जन्मभुमि मुक्तीचा लढा चालू असून परकीय आक्रमणाने या मंदिराचा विध्वंस केला. त्यानंतर सुमारे 70 पेक्षा जास्त लढाया झाल्या. त्यामध्ये लाखो हिंदुच्या कत्तली झाल्या. या काळातील बहुतेक राजा महाराजांनी हे पवित्र स्थान आक्रमकांच्या ताब्यातुन मुक्त करण्याचा प्रयत्न केला. स्वातंत्र्या नंतरही स्वकीय सत्तेवर पुर्नउभारणी झाली. त्यासाठी तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी पुढाकार घेतला व भारताचे राष्ट्रपती श्रीराम जन्मभुमि मात्र कुलूप बंद अवस्थेत होती.

या मंदिराच्या निर्माणामध्ये देशातील सर्व हिंदुचा सहभाग असावा. यासाठी प्रत्येक घरापर्यंत हे निधी संकलन अभियान राबविण्यात येत आहे. या मंदिरासाठी 67 एकर जागा आपल्याला 67 एकर जागा आपल्याला मिळाली असून या परिसरात भव्य मंदिराबरोबरच ग्रंथालय, मंदिर मुक्तीच्या लढयाचा इतिहास, हिंदु जीवन कार्यक्रमासाठी भव्य हॉल, भक्तांसाठी निवास व्यवस्था अशी व्यवस्था करण्यात येणार असल्याचेही नाना जाधव यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे स्वागत राजेश दंडे यांनी केले तर प्रास्ताविक नगरसेवक अनिल अभंगराव यांनी केले तर सुत्रसंचालन संदीप सावेकर यांनी केले.

याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक सुरेशनाना जाधव, पंढरपूर जिल्हा संघचालक ॲड.माधव मिरासदार, उपनगराध्यक्षा श्‍वेता डोंबे, पंढरपूर मर्चन्ट बँकेचे चेअरमन नागेश भोसले या मान्यवरांसह पंढरपूर नगरपालिकेचे नगरसेवक, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *