गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पंढरपूर कडे येत असताना राष्ट्रवादीच्या महिला नेत्यांचे गंठण लंपास

राष्ट्रवादी कॉग्रेस ओबीसी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा साधना रामचंद्र राऊत  रा.भक्तिमार्ग पंढरपूर या रांझणी येथील आपल्या शेतातून पंढपुरातील घराकडे परतत असताना गोपाळपूर रस्त्यावरील कुंभार वीटभट्टी नजीक काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने हिसका मारून गळ्यातील १७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण खेचून गोपाळपूर दिशेने निघून गेला. 

या बाबत साधना राऊत यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून,एक अनोळखी मोटार सायकल चालवणारा स्वार त्याची उंची साधारण 5फुट5इंच व अंगावरती आभाळी रंगाचा टी शर्ट घातलेला त्याने गळ्यातील सोन्याच्या साखळीतील गंठण बळजबरीने हिसकावुन घेवुन गेला आहे असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *