ताज्याघडामोडी

सरकोली येथील एकास भाउजीला दारू का पाजली म्हणून मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी 

पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथील दत्तात्रय प्रल्हाद कपणे यांच्या घरचा गॅस सिलेंडर संपल्याने सिलेंडर आणण्यासाठी मोटारसायकल नसल्याने त्यांनी गावातीलच आपला मित्र संतोष अंकुश भोसले याची दुचाकी घेऊन त्याला सोबत घेऊन मंगळवेढा येथून सिलेंडर आणले खरे पण सदर मित्र दारू पिऊन घरी गेला. याची माहिती मिळताच संतोष अंकुश भोसले यांचे म्हेवणे  किशोर वाघ हा  सोबत मित्रांना घेऊन घरी आला व माझ्या भाउजीस दारू पाजतो काय म्हणत कुटूंबियांदेखत मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद  दत्तात्रय प्रल्हाद कपणे यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. 
       रात्री 11.45 वा.चे सुमारास संतोष भोसले याचा मेव्हणा किशोर वाघ हा आपले सोबत सोन्या बाबर,लिंगा शेंडगे व इतर तीन अनोळखी इसम असे दोन मोटार सायकल वर माझे घरी आले व मला झोपेतून उठवून आत घरामध्ये जबरदस्ती ने घूसून किशोर वाघ याने शिवीगाळीकरून हाताने गालात जोरात चापट मारली.त्यावेळी लहान मुले भितीने मोठ मोठ्याने ओरडू लागली .तसेच फिर्यादीची पत्नी ही ला वाचवणेकरता मध्ये आल्यानंतर किशोर वाघ याने तिला बाजूला ढकलून दिले. मुलांचा ओरडण्याचा आवाज एकून माझ्या घरापासून जवळ राहणारे तानाजी भोसले व त्यांची पत्नी संगिता भोसले असे धावत पळत फिर्यादीच्या घराकडे आले त्यांच्या देखत देखिल किशोर वाघ याने तुला ठेवतच नाही,तुझे हात पाय तोडतो,तुला उद्या बगून घेतो असे म्हणून सर्वजण शिवीगाळी दमदाटी करत मोटार सायकल वरून निघून गेले असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *