ताज्याघडामोडी

१८ वर्षीय तरुणीचा धक्कादायक मृत्यू, टूथपेस्ट ऐवजी चुकून विषारी औषधाने घासले दात

दात घासल्याशिवाय आपल्या कोणाच्याच दिवसाची सुरुवात होत नाही. पण याच दात घासण्यावरून मुंबईत काळजाचा ठोका चुकवणारी घटना समोर आली आहे. टूथपेस्ट समजून उंदीर मारण्याच्या औषधाने दात घासल्याने एका १८ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. मुंबईतल्या धारावी परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

मुंबईतून 21 वर्षीय तरुणाला 10 पिस्तुलसह अटक

मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 7 ने शस्त्राचा साठा करण्यासाठी मुंबईत आलेल्या एका व्यक्तीला अटक केली आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांची आवक ही आता यंत्रणांसाठी चिंतेचा विषय बनली आहे. गुन्हे शाखेचे डीसीपी अकबर पठाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलुंड भागात एक व्यक्ती मोठ्या प्रमाणात शस्त्रे घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती, त्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट 7 चे […]

ताज्याघडामोडी

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ‘सर्वोच्च’ निकाल, राज्य सरकार प्रचंड आशावादी

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उद्या सर्वोच्च न्यायालय अंतिम निकाल देणार आहे. उद्या सकाळी साडे दहा वाजता सर्वोच्च न्यायालय मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर निकाल देणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने 26 मार्चला निकाल राखून ठेवला होता. मराठा आरक्षण वैध ठरवण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात उद्या अंतिम निकाल येईल. अॅड. जयश्री पाटील यांनी मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्यानंतर […]

ताज्याघडामोडी

प्रवाशांनी भरलेल्या बेस्ट बसला आग

मुंबईतील भांडुपमध्ये प्रवाशांनी भरलेल्या 605 क्रमांकाच्या बेस्ट बसला अचानक भीषण आग लागली. परिसरातील नागरिकांनी तातडीने हालचाली करत ही आग विझवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. भांडुप स्टेशनवरुन वैभव चौकच्या दिशेने ही बस प्रवाशांना घेऊन निघाली होती. भांडुपच्या अशोक केदारे चौक परिसरात ही बस आली असता बसच्या दर्शनी भागातून धूर येऊ लागला आणि काही वेळातच या बसने पेट […]

ताज्याघडामोडी

मंत्रालयासमोर विष पिऊन छावा संघटनेतील पदाधिकाऱ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई : मराठा आरक्षण प्रश्नी कोणतीही हालचाल न झाल्यामुळे अखेर आज जालना जिल्ह्यातील छावा संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी मंत्रालयासमोर विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु यावेळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी तत्काळ कारवाई करत या पाचही आंदोलकांना ताब्यात घेतलं. त्यानंतर सर्व आंदोलकांना मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात नेण्यात आले. या आंदोलकांनी पोलीस प्रशासन आपल्यावर दबाव आणत असल्याचा आरोप केला आहे. […]

ताज्याघडामोडी

सह आयुक्तांनी पाणी समजून पिले सॅनिटायझर

मुंबई, 03 जानेवारी : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. परंतु, अर्थसंकल्प सादर होत असताना सह आयुक्त रमेश पवार हे पाण्याऐवजी सॅनिटाझर प्यायल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आज मुंबई महापालिकेच्या सभागृहात चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. बजेटचे वाचण सुरू होण्यापूर्वी सह आयुक्त रमेश पवार यांनी पाण्याऐवजी हात […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

मुंबईतील सर्वात मोठं ड्रग्स रॅकेट उद्ध्वस्त

मुंबई, 28 जानेवारी : मुंबईतील सर्वात मोठं एलएसडी ड्रग्स रॅकेट उद्ध्वस्त करण्यात एनसीबीला यश आलं आहे. 27 जानेवारीपासून मुंबईत एक ऑपरेशन सुरू होते. याच्या माध्यमातून मुंबईतील सर्वात मोठं एलएसडी ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आलं आहे. यामध्ये 336 ब्लॉट्स एलएसडी, अर्धा किलो मारुआना जप्त करण्यात आलं आहे. या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली आहे. यापैकी एक […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

गुन्हा केला तर भरावा लागेल 50 लाखांपर्यंत दंड!

मुंबई, 22 जानेवारी : गुन्हेगारांना चाप बसावा याकरता पोलिसांकडून अनेक युक्त्या लढवल्या जातात. मुंबई पोलिसांनी तर एक पाऊस पुढे टाकत गुन्हेगारांना आळा बसावा याकरता गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांकडून चांगला वर्तन व्हावे म्हणून बॉण्ड भरून घेण्याचा निर्णय घेतला आहे. आणि जर या बाॅण्डचे उल्लंघन केले तर 15  ते 50 लाख रुपयांपर्यंतचा दंड या गुन्हेगारांना भरावा […]

ताज्याघडामोडी

मुंबईत मांत्रिकाने वृद्धेला घातला 40 लाखांचा गंडा

मुंबई, 21 जानेवारी : पैशांचा पाऊस पाडण्याकरता तांत्रिक मांत्रिक सारख्या अघोरी प्रथा आजही 21 व्या शकतात केल्या जातात. धक्कादायक म्हणजे मुंबई सारख्या जागतिक प्रगत शहरात असा प्रकार घडत आहे. मुंबईतील नागपाडा भागातून याप्रकरणी 2 मांत्रिकांना अटक करण्यात आली आहे. नागपाडा येथे एका 82 वर्षीय महिलेचा तांत्रिक मांत्रिक या अंधश्रद्धेवर खूप विश्वास होता. नातीच्या लग्नातील अडसर आणि […]

ताज्याघडामोडी

क्रिकेटच्या मॅचवरून दोन गटात तुफान राडा

पनवेल, 19 जानेवारी : नवी मुंबईमध्ये क्रिकेटच्या मॅचवेळी दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे. रविवारी कंळबोलीमध्ये हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रविवारी झालेल्या मॅचमध्ये स्थानिक नगरसेवकाच्या टीमचा विजय झाला, पण यानंतर दोन टीममध्ये बाचाबाची झाली. यानंतर रात्री 10 च्या सुमारास विजय झालेल्या टीमच्या खेळाडूंच्या मेडिकल स्टोअरमध्ये पराभूत झालेले खेळाडू […]