गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

मुंबईतील सर्वात मोठं ड्रग्स रॅकेट उद्ध्वस्त

मुंबई, 28 जानेवारी : मुंबईतील सर्वात मोठं एलएसडी ड्रग्स रॅकेट उद्ध्वस्त करण्यात एनसीबीला यश आलं आहे. 27 जानेवारीपासून मुंबईत एक ऑपरेशन सुरू होते. याच्या माध्यमातून मुंबईतील सर्वात मोठं एलएसडी ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आलं आहे. यामध्ये 336 ब्लॉट्स एलएसडी, अर्धा किलो मारुआना जप्त करण्यात आलं आहे. या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली आहे.

यापैकी एक आरोपी इंजिनियर असून तो TCS साठी काम करतो. याचं नाव अरबाझ शेख असल्याचं समोर आलं आहे. त्याला ड्रग्स पुरवणाऱ्या सुरज सिंग यालाही अटक करण्यात आली आहे. या जप्तीत 215 एलएसडी ब्लॉट्स, 6 ग्रॅम कोकेन आणि अर्धा किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. नेरुळमधील एका फ्लॅटमध्ये एनसीबीने ही छापेमारी केली होती. गांजाचं कन्जमप्शनसाठी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

डार्कवेबवरून परदेशातून ड्रग्जची खरेदी केली जात होती. अरबाझ शेख हा या प्रकरणातील पेडलर असून डीजेचंही काम करतो. तीनही आरोपींकडून एकूण 336 ब्लॉट्स एलएसडी, 430 ग्रॅम गांजा आणि 6 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आली आहे.

गेल्या अनेक दिवसांमध्ये बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन समोर आलं आहे. या प्रकरणात आतापर्यंत अनेक कलाकारांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. दरम्यान एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी एक ऑपरेशन केलं होतं. यामध्ये मुंबईत सुरू असलेल्या ड्रग्ज रॅकेटचा भांडाफोड करण्यात आलं आहे. सध्या अटक केलेल्यांची चौकशी केली जात असून यातून अनेक धागेदोरे सापडू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *