मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 7 ने शस्त्राचा साठा करण्यासाठी मुंबईत आलेल्या एका व्यक्तीला अटक केली आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांची आवक ही आता यंत्रणांसाठी चिंतेचा विषय बनली आहे. गुन्हे शाखेचे डीसीपी अकबर पठाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलुंड भागात एक व्यक्ती मोठ्या प्रमाणात शस्त्रे घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती, त्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट 7 चे प्रभारी मनीष श्रीधनकर यांच्या पथकाने सापळा रचला आणि त्याला ताब्यात घेतलं.
