मुंबई : लॉकडाऊन केल्यामुळे रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. त्यामुळे आणखी दहा दिवस लॉकडाऊन वाढवावा, असा सूर मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांनी मंगळवारी बैठकीत लावला. त्यामुळे बुधवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याविषयी शिक्कामोर्तब केले जाईल, असे सूत्रांनी सांगितले. तसेच सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये पुन्हा तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगत आहेत, त्यामुळे आपल्याला पूर्ण तयारी करून घ्यावीच लागेल, […]
Tag: #MAHARASHTRA
1 मेपासून होणाऱ्या 18 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरण मोहीमवर प्रश्नचिन्ह
मुंबई : येत्या 1 मे पासून देशात 18 वर्षावरील सर्व नागरिकांच्या लसीकरणाला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनेही 1 मे पासून व्यापक लसीकरणाची मोहिम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. पण आता या लसीकरणाच्या मोहिमेवर प्रश्नचिन्ह उभारण्याची शक्यता आहे. कारण राज्याला लोकसंख्येच्या प्रमाणात लसीच उपलब्ध झाल्या नसल्याचं स्पष्ट झालं आहे. देशात उपलब्ध असलेल्या तिन्ही लसी या मे […]
पुढचे चार दिवस महत्त्वाचे
मुंबई : एकीकडे उन्हाच्या झळा वाढत असताना आगामी चार दिवस म्हणजेच 29 एप्रिलपर्यंत मध्य भारतासह महाराष्ट्रात मेघगर्जना तसेच विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. यापूर्वी 11 एप्रिल रोजी राज्यात कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, सातारा, परभणी या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडला होता. त्यानंतर आता पुन्हा आगामी 5 दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता […]
होय, आजही प्रामाणिजपणा जिवंत आहे!
अमरावती : एखादी अमानवीय घटना घडली की लगेच लोक म्हणतात माणुसकी कुठे आहे. संपली माणुसकी असे लोक सहज म्हणून देतात पण आजही माणुसकी जिवंत असणाऱ्या घटना गोष्टी आपण कोरोना काळात अनुभवतोय. माणुसकीचा व प्रामाणिकतेचा परिचय देणारी एक घटना अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात समोर आली आहे. शासनाच्या रोजगार हमी योजनेत काम करणाऱ्या मजुराला सोडलेले 97 हजारांच्या पाचशे […]
नियम मोडून धूमधडाक्यात लग्न; मनपाकडून 50 हजारांचा दंड
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लग्न समारंभ अतिशय मर्यादित स्वरुपात करण्याचे शासनाचे निर्देश असतानाही जळगावात धूमधडाक्यात लग्न पार पडलं. याविरोधात महापालिकेने कारवाई करत 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला. शिवाय वधू-वराच्या मातापित्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर दंड ठोठावण्याची राज्यातील ही पहिलीच कारवाई असल्याचं समजतं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक लोकांचे बळी जात असताना शासन निर्णयाचे काटेकोर […]
राज्यात एसटी चालू राहणार, पण तुम्हाला प्रवास करता येणार का? जाणून घ्या
मुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कडक लॉकडाऊनची घोषणा बुधवारी करण्यात आलीय. राज्याच्या मुख्य सचिवांनी त्याबाबत एक परिपत्रक काढून गुरुवारी म्हणजे आज रात्रीपासून राज्यात कडक लॉकडाऊन लागू होणार असल्याची माहिती दिलीय. त्यासाठी कठोर नियमावलीही तयार करण्यात आलीय. यामध्ये प्रामुख्याने सार्वजनिक आणि खासगी प्रवासी वाहतुकीबद्दल कडक नियम लागू करण्यात आले आहेत. त्यात आता एसटी महामंडळासाठी एक नियमावली परिवहन […]
मोठी बातमी! राज्यात कडक लॉकडाऊन लागणार
मुंबई- राज्यात कठोर निर्बंध लावून सुद्धा कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली नाही. त्यामुळे राज्यात कडक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली. काही तासांत लॉकडाऊनबाबतच्या गाईडलाईन्स जारी करण्यात येतील, असंही ते म्हणाले आहेत. दुसरीकडे शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी लॉकडाऊनचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, असं म्हटलं आहे. त्यामुळे […]
राज्यातील 7 लाख 15 हजार रिक्षा परवाना धारकांना सानुग्रह अनुदान जाहीर
राज्य शासनाने राज्यातील रिक्षा परवाना धारकांना जाहीर केलेल्या सानुग्रह अनुदानासंदर्भात आढावा घेण्यासाठी आज परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी दिली आहे.आज मुंबईतील रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी व परिवहन विभागातील अधिकारी यांचे सोबत मंत्रालयात बैठक संपन्न झाली. राज्यात सात लाख पंधरा हजार रिक्षा परवाना धारक असून त्यांना प्रत्येकी 1500 रुपये प्रमाणे एकूण 107 कोटी रुपये सानुग्रह अनुदान […]
शिवसेना आमदाराच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे खळबळ
बुलडाणा, 19 एप्रिल : कोरोना काळात केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार असं राजकारण तापलं असतानाच बुलडाणा जिल्ह्यातील शिवसेना आमदार संजय गायकवाड सध्या चर्चेत आले आहेत. कारण आमदार गायकवाड यांनी नुकतीच भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत आक्षेपार्ह भाषेत टीका केली. त्यानंतर आता पुन्हा एकदा संजय गायकवाड यांची जीभ घसरली आहे. देवेंद्र […]
राज्यात आजपासून संचारबंदी लागू
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १३ एप्रिल रोजी संध्याकाळी ८.३० वाजता सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यामध्ये त्यांनी राज्यात १४ एप्रिल २०२१ रोजी रात्री ८ वाजेपासून १ मे २०२१ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत संपूर्ण राज्यात लॉकडाऊनचे निर्बंध लागू केले आहेत. त्यामध्ये या काळात संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यातून जीवनावश्यक सेवा किंवा […]