ताज्याघडामोडी

उपरी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी विट्ठल परिवार प्रणित व युवा परिवर्तन आघाडीचे ज्ञानेश्वर दगडु चव्हाण तर उपसरपंच पदी महेश सिताराम नागणे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

उपरी ता.पंढरपूर : उपरी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी विट्ठल परिवार प्रणित व युवा परिवर्तन आघाडीचे ज्ञानेश्वर दगडु चव्हाण तर उपसरपंच पदी महेश सिताराम नागणे यांची बिनविरोध निवड झाली आहे.  नुकत्याच पार पडलेल्या उपरी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये पंढरपूर तालुक्याचे लक्ष लागुन राहिले होते.सहकार शिरोमणीचे संचालक विलास जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली विट्ठल परिवार प्रणित युवा परिवर्तन आघाडीने 11 जागा पौकी […]

ताज्याघडामोडी

स्वेरी फार्मसीच्या चार विद्यार्थ्यांची हैद्राबाद व मुंबईच्या औषध निर्माण कंपनींमध्ये निवड

स्वेरी फार्मसीच्या चार विद्यार्थ्यांची हैद्राबाद व मुंबईच्या औषध निर्माण कंपनींमध्ये निवड   पंढरपूर- येथील स्वेरी संचालित कॉलेज ऑफ फार्मसीच्या रणजितसिंग रावसाहेब चौगुले व अक्षय बाळासाहेब पाटील या दोन विद्यार्थ्यांची मुंबई येथील कोप्रान फार्मास्युटिकल कंपनीत प्रोडक्शन ऑफीसर म्हणून निवड करण्यात आली आहे तसेच हैद्राबाद येथील ल्युटीअस फार्मास्युटिकल्स प्रायव्हेट लिमिटेड या नामांकित कंपनीत स्वेरी फार्मसीच्या सागर दामू पिसे […]

ताज्याघडामोडी

दहशत माजविणाऱ्या आंदेकर टोळीतील ११ जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई 

पुणे शहरातील मध्यवर्ती बाजारपेठेत दहशत निर्माण करणाऱ्या आंदेकर टोळीविरूद्ध पुणे पोलिसांनी संघटीत गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली आहे. त्यामध्ये 11 जणांना न्यायालयात हजर करण्यात आले असता विशेष न्यायालयाने त्यांना 16 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू उर्फ सुर्यकांत रानोजी आंदेकर (वय 60) आणि नंदकुमार बाबुराव नाईक (वय 72) हे दोघेही उपचारासाठी […]

ताज्याघडामोडी

पैसेवाले हेरून जाळ्यात ओढून ब्लॅकमेल करणाऱ्या हनीट्रॅप रॅकेटवर कारवाई

महिला दिनी दोन महिलांसह ४ जणांविरोधात बारामतीच्या महिला अधिकाऱ्यांनीच केली कारवाई महीला अरोपी व निलंबित पोलीसांकडून प्रतिष्ठीत व्यक्तींवर हनीट्रॅप करून खंडणी वसूल करणाऱ्या टोळीला बारामती पोलिसांनी गजाआड केले आहे. यामध्ये दोन महिला आरोपींचा देखील समावेश आहे. ते चौघेजण हनीट्रॅप करायचे प्रतिष्ठित लोक गाठायचे, त्यांच्यावर हनीट्रॅप करायचा आणि खंडणी वसूल करायची अशी या टोळीची पद्धत होती. त्यांनी […]

ताज्याघडामोडी

मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या रखडलेल्या कामाबाबत जलसंपदा मंत्र्याना सुचना करु

पंढरपूर- मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी 35 गावांना वरदान ठरणारी उपसा सिंचन योजना गेल्या अनेक दिवसांपासून रखडली आहे. त्याबाबत आपण स्वता जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना त्याबाबत सूचना करू व ते काम मार्गी लावण्याच्या सूचना करणार असल्याचे आश्‍वासन राष्ट्रवादी चे अध्यक्ष खा शरद पवार यांनी शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांना दिले आहे.दुष्काळी 35 गावातील शेतकर्‍याच्या शेतीच्या […]

ताज्याघडामोडी

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोळी जमातीला न्याय दिला तर हीच शिवसेना नेते अनंत तरे यांना खरी श्रध्दांजली ठरेल- गणेश अंकुशराव

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोळी जमातीला न्याय दिला तर हीच शिवसेना नेते अनंत तरे यांना खरी श्रध्दांजली ठरेल- गणेश अंकुशराव पंढरपूर (प्रतिनिधी):- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आदिवासी कोळी जमातीला न्याय देणे म्हणजे हीच स्वर्गीय शिवसेना नेते अनंत तरे यांना खरी श्रध्दांजली ठरेल! असे मत महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी व्यक्त केले. […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

धुमधडाक्यात वाढदिवस साजरा करणं आलं पोलिसांच्या अंगलट

सोलापूर | पोलिस कर्मचार्याचा वाढदिवस साजरा करणं वेळापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाच्या चांगलचं आंगलट आलयं. जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पोलीस उपनिरीक्षक दीपक जाधव व पोलिस कर्मचारी विनोद साठे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. गेल्या आठवड्यात पोलिस कर्मचारी विनोद साठे यांचा वेळापूर चौकात धुमधड्याक्यात वाढदिवस साजरा केला होता. यावेळी सोशल डिस्टन्सींग फज्जा उडाला होता. […]

ताज्याघडामोडी

समृध्दी ट्रॅक्टर यांनी जागतिक महिला दिनानिमित्त केला अनोखा उपक्रम

*समृध्दी ट्रॅक्टर यांनी जागतिक महिला दिनानिमित्त केला अनोखा उपक्रम* स्त्री शक्तीचा कर्तुत्वाचा गौरव, तिच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने समृद्धी ट्रॅक्टर्सच्या माध्यमातून एकूण ३३ कुटुंबातील महिलांना रुपये ११,०००ची FD करून देण्यात आली असे चेअरमन अभिजीत पाटील यांनी सांगितले. समाजात प्रत्येक क्षेत्रात महिलांचे योगदान अनन्यसाधारण आहे. आज प्रत्येक कुटुंबातील स्त्री आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी […]

ताज्याघडामोडी

आरक्षित गटातील उमेदवाराचा आता गुणांच्या आधारे खुल्यागटात समावेश करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश  

 देशभरात सद्या विविध आरक्षणांचा मुद्दा गाजत आहे. राज्यात देखील मराठा समाजाचा आरक्षणासाठी लढा सुरु आहे. अशातच, शुक्रवारी झालेल्या एका खटल्यात महत्वपूर्ण निकाल दिला आहे. राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यानं खुल्या प्रवर्गासाठी निश्चित केलेले गुण मिळवल्यास त्यांना खुल्या प्रवर्गात प्रवेश देण्यात यावा, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. यामुळे, आरक्षित गटातील विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. पसंतीच्या […]

ताज्याघडामोडी

पोलीस नाईक कोळेकरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केलेल्या ‘त्या’ महिलेच्या पतीचीही आत्महत्या  

पोलीस कर्मचारी हरिभाऊ कोळेकर याच्या वारंवार होणाऱ्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून काही दिवसांपूर्वी एका महिलेने आत्महत्या केली होती. दरम्यान आत्महत्या केलेल्या महिलेच्या पतीने देखील एक व्हिडिओ शेअर करत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने स्वतःचा व्हिडिओ शेअर केलाय. व्हिडिओमध्ये पत्नीच्या आत्महत्येस देखील पोलीस कर्मचारी हरिभाऊ कोळेकर यालाच जबाबदार धरले असून, सोबत […]