स्वेरी फार्मसीच्या चार विद्यार्थ्यांची हैद्राबाद व मुंबईच्या औषध निर्माण कंपनींमध्ये निवड
पंढरपूर- येथील स्वेरी संचालित कॉलेज ऑफ फार्मसीच्या रणजितसिंग रावसाहेब चौगुले व अक्षय बाळासाहेब पाटील या दोन विद्यार्थ्यांची मुंबई येथील कोप्रान फार्मास्युटिकल कंपनीत प्रोडक्शन ऑफीसर म्हणून निवड करण्यात आली आहे तसेच हैद्राबाद येथील ल्युटीअस फार्मास्युटिकल्स प्रायव्हेट लिमिटेड या नामांकित कंपनीत स्वेरी फार्मसीच्या सागर दामू पिसे व स्वप्नील शिवाजी राऊत या दोन विद्यार्थ्यांची ‘रिसर्च ट्रेनी इन प्रोडक्ट डेव्हलपमेंट’ या पदावर निवड करण्यात आलेली आहे.
फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट, क्वालिटी कंट्रोल, प्रोडक्शन, मार्केटिंग इ. विविध विभाग असतात. यापैकी रिसर्च अँड डेव्हलपमेंट या विभागांमध्ये औषध निर्मिती व त्याबाबतचे संशोधन हे नेहमीच सुरू असते. त्यामुळेच औषध निर्मिती करणाऱ्या कंपनीचे रिसर्च अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट हे एक प्रकारे कंपनीचे ब्रेन म्हणून काम करत असते. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा तसेच उद्योग, नोकरी अथवा स्वतःचा बिझनेस यापैकी कोणत्याही क्षेत्रात विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन करावे यासाठी स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसीकडून नियमितपणे विविध शैक्षणिक व विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. औषध निर्माण करणाऱ्या कंपनीत निवड झालेल्या या विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. मिथुन मणियार, शैक्षणिक समन्वयक प्रा. रामदास नाईकनवरे, प्रा. वृणाल मोरे व ट्रेंनिग व प्लेसमेंटचे विभागप्रमुख प्रा. प्रदीप जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. निवड झालेल्या चारही विद्यार्थ्यांचे स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले तसेच संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्त, कॅम्पस इन्चार्ज, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी अभिनंदन केले.