ताज्याघडामोडी

उपरी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी विट्ठल परिवार प्रणित व युवा परिवर्तन आघाडीचे ज्ञानेश्वर दगडु चव्हाण तर उपसरपंच पदी महेश सिताराम नागणे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

उपरी ता.पंढरपूर : उपरी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी विट्ठल परिवार प्रणित व युवा परिवर्तन आघाडीचे ज्ञानेश्वर दगडु चव्हाण तर उपसरपंच पदी महेश सिताराम नागणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. 
नुकत्याच पार पडलेल्या उपरी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये पंढरपूर तालुक्याचे लक्ष लागुन राहिले होते.सहकार शिरोमणीचे संचालक विलास जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली विट्ठल परिवार प्रणित युवा परिवर्तन आघाडीने 11 जागा पौकी 6 जागावर विजय संपादन करुन ग्रामपंचायतीमध्ये सत्ता परिवर्तन केली. सरंपच पद हे ओबीसी पुरुष साठी राखीव होते सरंपच पदासाठी ज्ञानेश्वर दगडु चव्हाण यांचा व उपसरपंच पदासाठी महेश सिताराम नागणे यांचा एकमेव अर्ज राहिल्याने बिनविरोध निवड झाल्याची निवडणुक निर्णय आधिकारी कांबळे यांनी जाहीर केले. 
सरपंच निवडीचे वेळीस नुतन ग्रामपंचायत सदस्य सुरेश (शेठ) नागणे, महेश नागणे,ज्ञानेश्वर चव्हाण,सौ.पार्वती दत्तात्रय नागणे,सौ.सुरेखा शंकर सावंत, सौ.लक्ष्मीबाई विलास कोळी आदी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. 
निवडी नंतर विलास जगदाळे,बाळासाहेब नागणे,हणमंत नागणे,साहेबराव नागणे, सतिष नागणे, श्रीनिवास नागणे, साहेबराव जगदाळे, दत्तात्रय नागणे, बाबासाो नागणे,कृष्णा नागणे,    प्रविण नागणे, सुधाकर जाधव,अरुण नागणे,अमोल नागणे,विलास कोळी,महादेव नागणे,रावसाहेब नागणे, सुरेश जाधव, चंद्रकांत मोहिते, कल्याण नागणे, समाधान जाधव,  माऊली पाटील, हरी पाटील, ज्ञानेश्वर किरत, अल्लाउद्दीन मुलाणी, भारत चव्हाण, सुशांत जगदाळे, स्वागत नागणे, विक्रांत जगदाळे, विजय नागणे, गजु नागणे, अशोक नागणे,इस्माईल मुलाणी,बलभिम खाडे, यांच्या उपस्थित कार्यकत्र्यांनी गुलालाची उधळण करीत फटाक्यांची अतिषबाजी करत जल्लोश साजरा केला. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *