ताज्याघडामोडी

दहशत माजविणाऱ्या आंदेकर टोळीतील ११ जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई 

पुणे शहरातील मध्यवर्ती बाजारपेठेत दहशत निर्माण करणाऱ्या आंदेकर टोळीविरूद्ध पुणे पोलिसांनी संघटीत गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली आहे. त्यामध्ये 11 जणांना न्यायालयात हजर करण्यात आले असता विशेष न्यायालयाने त्यांना 16 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू उर्फ सुर्यकांत रानोजी आंदेकर (वय 60) आणि नंदकुमार बाबुराव नाईक (वय 72) हे दोघेही उपचारासाठी ससून रूग्णालयात दाखल झाले आहेत. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केलेल्या मोक्का कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे.

ऋषभ देवदत्त आंदेकर (22), हितेंद्र विजय यादव (32), दानिश मुशीर शेख (28), योगेश निवृत्ती डोंगरे (28), विक्रम अशोक शितोळे (34), अक्षय दशरथ अकोलकर (28), स्वराज उर्फ शक्ती निलंजय वाडेकर (19), प्रतिक युवराज शिंदे (18), यश संजय चव्हाण (19), देविदास उर्फ देवा बाळासाहेब गालफांडे (21) आणि वैभव नितीन शहापुरकर (19) अशी मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी ओंकार गजानन कुडले (वय 21) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *