ताज्याघडामोडी

वर्षा बंगल्याचं खानपानाचं बिल २ कोटी ३८ लाख, चहात सोन्याचं पाणी घातलं होतं काय?, अजितदादा भडकले

मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्याचं ४ महिन्यांचं खानपानाचं बिल २ कोटी ३८ लाख रुपये आलेलं आहे. प्रसारमाध्यमांनी तशा बातम्या दिलेल्या आहेत. वर्षा बंगल्यावर चहामध्ये काय सोन्याचं पाणी घातलं जायचं काय? असा संतप्त सवाल राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना केला. आम्हीही उपमुख्यमंत्री म्हणून काम केलंय. माझे अनेक जवळचे सहकारी मुख्यमंत्री होते, पण त्यांच्या […]

ताज्याघडामोडी

चिक्कू का तोडला? महिलेने हटकलं, तरुणाला खटकलं; घरात शिरून महिलेवर…

शहरातील सिडको परिसरात असलेल्या हनुमान चौक शॉपिंग सेंटर येथील एका घराच्या अंगणाबाहेरील चिकूच्या झाडावरील चिकू तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या गावगुंडास महिलेने हटकल्याने त्याने थेट घराचा सुरक्षा दरवाजा ओलांडून घरात शिरून महिलेवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद झाली आहे. सिडको परिसरात गावगुंडांचा हैदोस वाढल्याने नागरिकांमध्ये आता भीतीचे वातावरण निर्माण झाले […]

ताज्याघडामोडी

प्रमोशनसाठी बॉससोबत संबंध ठेव! पतीचे अत्याचार; तिनं लेकीसाठी सगळं सहन केलं; अखेर…

मध्य प्रदेशच्या इंदूरमधील एका महिलेनं पतीवर वाईफ स्वॅपिंगचा आरोप केला आहे. पीडितेनं दाखल केलेली याचिका जिल्हा न्यायालयानं मंजूर केली आहे. आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी पती त्याच्या बॉस आणि मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत असल्याचं पीडितेनं तक्रारीत म्हटलं आहे. मूळची इंदूरची असलेल्या पीडित महिलेचा विवाह पुण्यात राहणाऱ्या अमित छाब्रासोबत झाला. लग्नाच्या काही महिन्यांनंतर अमित चुकीच्या मित्रांच्या संपर्कात […]

ताज्याघडामोडी

चिंचवडमध्ये हायव्होल्टेज ड्रामा, मतदानापूर्वी राष्ट्रवादी-ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी उचललं

पिंपरी – चिंचवड पोलिसांनी कोणतेही कारण नसताना शनिवारी (२५ फेब्रुवारी) रात्री उद्धव ठाकरे गटाच्या सैनिकांची आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांची धरपकड केली. या कार्यकर्त्यांना कोणताही गुन्हा नसताना दोन ते चार तास पोलिस ठाण्यात बसवून ठेवले. निवडणुकीचे काम करता येऊ नये, यासाठीच पोलिसांनी सत्ताधारी पक्षाच्या सांगण्यावरून आम्हाला डांबून ठेवल्याचा आरोप शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते करत आहेत. […]

ताज्याघडामोडी

नाहीतर पुण्यात जाऊन अजित पवारांचे मी बारा वाजवेन; नारायण राणे यांचा घणाघात, इतके का भडकले

अजितदादांना बारामतीच्या बाहेर कितपत राजकारण कळतं हे मला माहीत नाही आणि मला बोलायची गरज नाही. अजितदादांनी बारामतीच्या बाहेर येऊन दुसऱ्यांचं बारसं करू नये आणि माझ्या फंद्यात पडू नये, नाहीतर पुण्यात येऊन मी त्यांचे बारा वाजवेन’, असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अजित पवारांना दिला आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्याकडे आता राहिलंय तरी काय?, राहिलेले […]

ताज्याघडामोडी

पाच वर्षाच्या चिमुरडीला सावत्र आईने संपवलं, फिट येऊन मृत्यूचा कांगावा, शहारे आणणारी घटना

आई मुलीच्या नात्याला काळिमा फासला असल्याची घटना घडली आहे. मुलगी त्रास देते म्हणून निर्दयी सावत्र आईने पाच वर्षाच्या मुलीचा चटके दिले. त्यानंतर कठीण वस्तू डोक्यात मारुन मुलीची हत्या केली. हा धक्कादायक प्रकार पुण्यातल्या उत्तमनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला आहे. हत्या केल्यानंतर मुलीला फिट आल्याचा बहाणा करून तीला डॉक्टरांकडे उपचारासाठी नेलं. परंतु वैद्यकीय तपासणीत मारहाण झाल्याचं […]

ताज्याघडामोडी

मोठ्या भावाला पत्नीसोबत नको त्या अवस्थेत बघितलं; लहान भावाचं कृत्य पाहून पोलिसही चक्रावले

उल्हासनगर शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधाच्या संशयातून लहान भावानेच आपल्या मोठ्या भावाची निर्घृण हत्या केली. शहरातील शहाड परिसरातील एका कॉलनीत ही धक्कादायक घटना घडली. अमित (वय २६ वर्ष) असं अटक करण्यात आलेल्या लहान भावाचं नाव आहे. तर रोहित (वय २८ वर्ष) असे निर्घृणपणे हत्या झालेल्या मोठ्या भावाचं नाव आहे. पोलीस सूत्राने […]

ताज्याघडामोडी

राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर पोलिसांकडून गुन्हा दाखल, अडचणीत वाढ

राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. कारखान्यासाठी प्रलोभने दाखवून शेअर्स गोळा करत फसवणूक केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या माध्यमातून हसन मुश्रीफ यांनी ४० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप विवेक कुलकर्णी यांनी केला आहे. त्यांच्या फिर्यादीवरून मुरगुड पोलीस ठाण्यात हसन मुश्रीफ यांच्यावर गुन्हा दाखल […]

ताज्याघडामोडी

येत्या दोन दिवसात पुन्हा राजकीय भूकंप होणार? २० आमदारांबाबत उदय सामंत यांचं मोठं विधान!

गेल्या काही दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयात राज्यातील सत्तासंघर्षावर सुनावणी सुरू आहे. शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर ही सुनावणी सुरू असून शिवसेनेचा व्हीप मोडल्यामुळे त्यांना अपात्र ठरवण्यात यावं, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर हे आमदार अपात्र ठरले, तर राज्याच्या राजकारणात काय घडणार? याविषयी तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी […]

ताज्याघडामोडी

पोलिसच असुरक्षित… दोन गुंडांचा वाद सोडविण्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला

गुंडांचा वाद सोडविण्यासाठी गेलेल्या एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकावर हल्ला करत मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. ही उल्हासनगर शहरातील शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात घटना घडली आहे. मारहाणीच्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आकाश गायकवाड आणि गणेश कांबळे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपी गुंडाची नावे आहेत. खळबळजनक बाब म्हणजे ठाणे पोलीस आयुक्त कार्यलयात अंतर्गत ३५ […]