डोक्यावर चार लाखांचं खासगी कर्ज, अर्धा एकर शेती त्यात पावसाने दिलेला दगा करायचं काय या चिंतेत असलेले शेतकरी गोपाळ भोजने यांच्या डोळ्यासमोर सोयाबीनचे पीक वाळत होतं. हातातोंडाशी आलेलं पीक जगावायच्या प्रयत्नात विजेचा धक्का बसल्यानं भोजने यांनी जीव गमावला. फ्यूज टाकताना त्यांना विजेचा धक्का लागला अन् त्यात त्यांचा मृत्यू झाला. पत्नी तीन मुलं अन् आई असं […]
ताज्याघडामोडी
आ आवताडे यांच्या प्रयत्नांतून मंगळवेढा तालुक्यातील ग्रामीण आरोग्य उभारणीसाठी ३ कोटी ३० लाख रुपये निधी मंजूर
प्रतिनिधी – केंद्रीय १५ वा वित्ती आयोग अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील ग्रामीण भागातील खोमनाळ, कात्राळ, ढवळस व अकोला येथे नव्याने मंजुरी भेटलेल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्र उभारणीसाठी प्रत्येकी ५५ लाख असे २.२० कोटी व मंगळवेढा आणि पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालय केंद्रातील “ब्लॉक पब्लिक हेल्थ युनिट” निर्मितीसाठी प्रत्येकी ५५ लाख असे १.१० कोटी निधी मंजूर झाल्याचे पत्र आमदार […]
नाकाला चिमटा लावून आईनेच केली पोटच्या गोळ्याची हत्या
अकोला शहरातील बलोदे लेआऊटमध्ये एका आईनेच आपल्या 5 वर्षाच्या मुलीची हत्या केल्याचे धक्कादायक प्रकरण घडकीस आले आहे. किशोरी रवी आमले असे या 5 वर्षीय मुलीचे नाव असून विजया आमले असे मारेकरी आईचे नाव आहे. सुरुवातीला मारेकरी आईने नाकाला चिमटा लावून मुलगी झोपल्याचा बनाव केला होता. मात्र वैद्यकीय अहवालात या हत्येचा उलगडा झाला आहे. या प्रकरणी […]
मोठ्या विश्वासानं कामावर ठेवलं; मोलकरणीचे धक्कादायक कृत्य, मालक पोलीस दरबारी, नेमकं काय घडलं?
घरात दिवसभर मोलकरीण काम करत असेल तर सावधान रहा. डोंबिवली जवळच्या दावडी भागातील रिजेन्सी इस्टेटमध्ये राहत असलेल्या एका काँग्रेस कार्यकर्त्यांच्या घरातून एका मोलकरीणने २ लाख ९४ हजार रुपयांची रक्कम चोरुन नेली आहे. या चोरीप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. अमित भास्कर म्हात्रे (४२) असे तक्रारदार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच नाव आहे. ते रिजेन्सी इस्टेटमध्ये मध्ये राहतात. […]
राज्यासाठी पुढचे २ दिवस महत्त्वाचे, या भागांना हवामान खात्याचा येलो-ऑरेंज अलर्ट जारी
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात येत्या २ ते ३ दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, अशी माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख डॉ. के.एस होसाळीकर यांनी दिली आहे. डॉ. होसळेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ सप्टेंबर आणि ७ सप्टेंबर या दोन दिवसात राज्यातल्या बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर पाहायला मिळेल. यावेळी वातावरणामध्ये हलकासा गारवाही असेल. मराठवाडा, […]
बसची धडक बसल्याने कारचालक संतापला; रागाच्या भरात तलवार काढली, थेट सपासप वार
शहरात अपघातांचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यात अपघात झाला तर अनेक वेळा जखमी व्यक्तींना मदत करायचे सोडून अनेक वेळा पळ काढलेले प्रसंग दिसतात. त्यात गाड्यांची धडक झाली तर समजूतदार पणाची भूमिका घायची सोडून थेठ शिवीगाळ केली जाते. यावरच थांबून राहत नाहीत तर एकमेकांवर हात उचलले जातात. हातात जे असेल ते फेकून मारले जाते. […]
राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय! ‘या’ भागात ऑरेंज अलर्ट
आजपासून पाऊस पुन्हा सक्रिय होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. राज्यातील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाची प्रतिक्षा कायम आहे.महिन्याच्या सुरूवातील पावसाने काही ठिकाणी हजेरी लावली. दरम्यान आजपासून राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. पुढील पाच दिवस राज्यात काही भागांमध्ये पाऊस जोरदार हजेरी लावणार […]
सासू-सुनेचं भांडण टोकाला;सुनेनं केली वयोवृद्ध सासूची हत्या
नागपूर शहरातील प्रतापनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील संभाजी चौक (नागोबा- मंदिर,जवळ) एका सुनेने स्वतःच्या ८० वर्षीय सासूची हत्या केल्याची घटना घडली आहे. ताराबाई शिखरवार असे हत्या झालेल्या वृद्ध सासूचे नाव आहे. तर पूनम आनंद शिखरवार असे हत्या करणाऱ्या आरोपी सुनेचे नाव आहे. महत्त्वाचे म्हणजे हत्येची घटना पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर घडली आहे. प्रतापनगर पोलिसांनी आरोपी सुनेला […]
गाडीवर ‘महाराष्ट्र शासन’ पाटी; संशय येताच पोलिसांनी गाडी अडवली, कोट्यवधींचा गांजा जप्त
वाहनावर ‘महाराष्ट्र शासन’ अशी पाटी लावून गांजाची तस्करी करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी महिलेसह तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एक कोटी चार लाख रुपये किमतीचा ५२० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथक दोनने नगर रस्त्यावर ही कारवाई केली. संदीप बालाजी सोनटक्के (वय २९, रा. रायगड), निर्मला […]
शिक्षक दिनाला 60 हजार शिक्षकांचा एल्गार, काळी फीत लावून शासनाचा निषेध करणार
राज्यामध्ये चार महिन्यांपूर्वी शिक्षक आणि शासकीय कर्मचारी, निम्नशासकीय कर्मचारी यांनी पेन्शनकरिता जोरदार आंदोलन केले. त्याचा फटका महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयापासून तर गावांच्या कार्यालयालादेखील बसला. त्यावेळेला शासनाने शिक्षकांच्या संदर्भात निर्णय करण्याचे आश्वासन दिले होते. (Teachers Pension Demand) परंतु अंशतः अनुदानावरील काम करणाऱ्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू नाही. राज्यात शिक्षकांची रिक्त पदे भरण्या आली नाहीत. 1 नोव्हेंबर, […]