गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

मोठ्या विश्वासानं कामावर ठेवलं; मोलकरणीचे धक्कादायक कृत्य, मालक पोलीस दरबारी, नेमकं काय घडलं?

घरात दिवसभर मोलकरीण काम करत असेल तर सावधान रहा. डोंबिवली जवळच्या दावडी भागातील रिजेन्सी इस्टेटमध्ये राहत असलेल्या एका काँग्रेस कार्यकर्त्यांच्या घरातून एका मोलकरीणने २ लाख ९४ हजार रुपयांची रक्कम चोरुन नेली आहे. या चोरीप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. अमित भास्कर म्हात्रे (४२) असे तक्रारदार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच नाव आहे. ते रिजेन्सी इस्टेटमध्ये मध्ये राहतात.

जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत हा चोरीचा प्रकार घडला आहे. अमित म्हात्रे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी सोनारपाडा भागात राहत असलेल्या सुनीता (४५) या महिलेविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. याबाबत काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि विकास अमित म्हात्रे यांनी सांगितले की, व्यवसातील पैसे हे कपाटाच्या ड्रॉवरमध्ये ५ लाख रूपये रोख रक्कम लॉक करून ठेवले होते. त्यानंतर दिनांक १५/०८/२०२३ रोजी मला पैशांची गरज असल्याने मी ड्रॉवरमध्ये ठेवलेली रक्कम घेण्यासाठी गेलो असता मला त्यामध्ये २ लाख ९० हजार रूपये कमी दिसले. म्हणून मी घरातील व्यक्तींना पैसे घेण्याबाबत विचारपुस केली असता त्यांनी पैसे नाही घेतल्याचे सांगितले.

त्यानंतर परत मी दिनांक ०२/०९/२०२३ रोजी माझे ड्रॉवरमध्ये १० हजार रूपये ठेवले. त्या नोटावरती स्टार मार्कीग केले होते. मी आज परत माझ्या ड्रॉवरमध्ये पैसे बघितले असता त्या १० हजार रूपयांपैकी ४ हजार दिसले नाही. म्हणून मी परत घरातील लोकांना पैसे कोणी घेतले का याबाबत विचारणा केली. तर कोणीही पैसे घेतले नसल्याचे सांगितले. त्यांनतर आम्हाला आमचे घरी घरकाम करणारी महिला सुनीतावर संशय आल्याने माझ्या पत्नीने विचारपुस करून तिची झडती घेतली. तिच्याकडे मी मार्कीग केलेल्या ५०० रूपयांच्या ८ नोटा मिळून आल्या. तेव्हा आमची खात्री झाली की, आमचे घरात घरकाम करणारी महिला सुनीतानेच या अगोदर देखील माझे पैसे चोरी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *