कासाळ ओढ्याला मिळणार कॅनाॅलचा दर्जा पंढरपूर तालुक्यातील ७ ते ८ गावे होणार कायमची दुष्काळमुक्त, जलसंपदामंञ्यांनी दिला लेखी आदेश पंढरपूर – सांगोला तालुक्यातून उगम पावणारा व पंढरपुर तालुक्यातील गार्डी, पळशी, सुपली, उपरी, भंडीशेगाव, शेळवे, वाडीकुरोली या गावातून वाहत जाणारा कासाळ ओढा भीमा नदीला मिसळतो. या ओढयामध्ये वरील सर्व गावांच्या पाणीपुरवठा विहीरी आहेत. त्यामुळे ओढयाला कॅॅॅॅनाॅलचा दर्जा […]
ताज्याघडामोडी
सुवर्णकन्या रेवती सोनारच्या जन्मदिनानिमित्त स्वेटर वाटप…
सुवर्णकन्या रेवती सोनारच्या जन्मदिनानिमित्त स्वेटर वाटप… पंढरपूर (प्रतिनिधी) : येथील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या श्री. व सौ. सविता रवि सोनार यांची सुवर्णकन्या कु. रेवती सोनार हिच्या जन्मदिवसाच्या औचित्याने होणाऱ्या अनावश्यक खर्चाला सोनार कुटुंबियांनी फाटा दिला आहे. परंतु वाचलेल्या रकमेतून त्यांची आस्थापना असलेल्या दहिवाळकर सर्व्हिसिंग सेंटरचे व्यवस्थापक व सहकारी तसेच त्यांच्या कुटुंबियांना लोकरीचे उबदार स्वेटर स्नेहभेट […]
पंढरीत असे पहिल्यांदाच घडले, बदली झाली म्हणून पेढे वाटले !
पंढरपूरच्या तहसीलदार वैशाली वाघमारे यांची बहुप्रतीक्षित बदली झाल्याचे वृत्त आज पंढरपूर शहर व तालुक्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून झळकले आणि वारंवार तहसील कार्यालयात हेलपाटे मारून वैतागून गेलेल्या अनेक सर्वसामान्य नागिरकांनी आनंद व्यक्त केला असून त्याच बरोबर बळीराजा शेतकरी संघटना,कोळी महासंघ यांनी तर संत नामदेव पायरी परिसरात अक्षरश पेढे वाटून आपला आनंद साजरा […]
ग्रामपंचायत निवडणुकीच्या आखाड्यात शिवसेना पुर्ण ताकतीनिशी उतरणार- महावीर देशमुख
ग्रामपंचायत निवडणुकीच्या आखाड्यात शिवसेना पुर्ण ताकतीनिशी उतरणार- महावीर देशमुख पंढरपूर (प्रतिनिधी):- ग्रामपंचायत निवडणुकीचे ‘पडघम’ वाजण्यास सुरुवात झाली असुन पंढरपूर तालुक्यातील ज्या-ज्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या आहेत त्या सर्व ग्रामपंचायत निवडणुकीच्या आखाड्यात शिवसेना पुर्ण ताकतीनिशी उतरणार असल्याची माहिती शिवसेना पंढरपूर तालुका प्रमुख महावीर देशमुख यांनी दिली. ग्रामीण भागातील तळागालातील कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी निवडणुक लढवणार असल्याचेही ते म्हणाले. […]
स्वेरीत कोरोनामुक्ती अभियान संपन्न
पंढरपूर- जिल्हा परिषद सोलापूर अंतर्गत असलेल्या पंचायत समिती, पंढरपूर आणि श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वेरीमध्ये एकदिवसीय ‘कोरोनामुक्ती अभियाना’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्वेरी अंतर्गत असलेल्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व कॉलेज ऑफ फार्मसीच्या पदवी, पदविका व पदव्युत्तर पदवी मधील सर्व सदस्यांची कोविड -१९ ची तपासणी करण्यात आली. या कोरोनामुक्त अभियानाचे […]
कोरोना लसीकरण मोहिमेच्या कार्यक्रमासंबंधी उपजिल्हा रुग्णालय येथे आ.प्रशांत परिचारक यांनी घेतली आढावा बैठक
आज सोलापूर जिल्हयाचे आमदार प्रशांतराव परिचारक यांनी भारत सरकारच्या आगामी काळात होणाऱ्या कोविड19 प्रतिबंधक लसीकरणाबाबत उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी, स्थानिक प्रतिनिधी व पदाधिकारी यांचे सोबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ.जयश्री ढोबळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले, पंचायत समिती उपसभापती प्रशांतभैय्या […]
स्वेरीच्या दोन विद्यार्थ्यांची मल्टीनॅशनल कंपनीत निवड स्वेरी प्लेसमेंट मध्ये अग्रेसर
स्वेरीच्या दोन विद्यार्थ्यांची मल्टीनॅशनल कंपनीत निवड स्वेरी प्लेसमेंट मध्ये अग्रेसर पंढरपूरः ‘पर्सीस्टंट सिस्टम्स आणि वेबटेक डेव्हलपर्स या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या दोन मल्टीनॅशनल कंपनींनी घेतलेल्या मुलाखतीत श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली. ‘पर्सीस्टंट सिस्टम्स आणि […]
चंद्रभागेच्या वाळवंटात महिलांसाठी चेंजिंग रूम उभारा! राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस ची मागणी
चंद्रभागेच्या वाळवंटात महिलांसाठी चेंजिंग रूम उभारा! राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसची मागणी पंढरपूर (प्रतिनिधी) : पंढरपुरातील चंद्रभागा नदीच्या वाळवंटात उभारण्यात आलेले महिला चेंजिंग रूम मागे येऊन गेलेल्या वादळी वाऱ्यात व महापुरात उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे चंद्रभागेचे पवित्र स्नानासाठी आलेल्या महिला भाविकांसाठी नव्याने कायमस्वरूपी ‘चेंजिंग रूम’ ची उभारणी करावी. अशी मागणी युवती कॉंग्रेस कडून करण्यात आलीय. याबाबत राष्ट्रवादी […]
विना नंबरच्या वाहनातून वाळू चोरीचा आणखी एक प्रकार पोलीस कारवाईत उघड
गेल्या काही महिन्यात पंढरपूर तालुक्यातील वाळू चोरांवर कारवाई करत असताना या कारवायांमध्ये ताब्यात घेण्यात येत असलेली विना नंबरची असल्याचे आढळून आले आहे.तर अनेक प्रकरणात पोलीस कारवाई कारण्यासाठी आल्यानंतर हेच विना नंबरचे वाहन जागेवरच सोडून वाळू चोर पसार झाल्याचे प्रकारही घडले आहेत.मात्र एकामागोमाग एक खेपा टाकण्याच्या उद्देशाने अथवा पोलीस कारवाईच्या भीतीने हेच […]
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या रस्त्याच्या कामास अडथळा करीत एकाचा आत्महत्येचा प्रयत्न
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत पंढरपूर तालुक्यातील कासेगाव ते तपकिरी शेटफळ ते मेथवडे या रस्त्याचे काम सुरू असून हे काम जवळपास पूर्णत्वास आले आहे मात्र तपकिरी शेटफळ हद्दीतील 400 मीटर रस्त्याचे काम अपुरे असून हे काम पूर्ण करण्यास तपकिरी शेटफळ येथील ग्रामस्थ युवराज बापू कांबळे बापू कांबळे उज्वला युवराज कांबळे लता बापू कांबळे […]