ताज्याघडामोडी पंढरी वार्ता न्युज पोर्टल

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या रस्त्याच्या कामास अडथळा करीत एकाचा आत्महत्येचा प्रयत्न

         मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत पंढरपूर तालुक्यातील कासेगाव ते तपकिरी शेटफळ ते मेथवडे या रस्त्याचे काम सुरू असून हे काम जवळपास पूर्णत्वास आले आहे मात्र तपकिरी शेटफळ हद्दीतील 400 मीटर रस्त्याचे काम अपुरे असून हे काम पूर्ण करण्यास तपकिरी शेटफळ येथील ग्रामस्थ युवराज बापू कांबळे बापू कांबळे उज्वला युवराज कांबळे लता बापू कांबळे हे विरोध करत असल्यामुळे या रस्त्याचे काम रखडले होते याबाबत प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता यांनी जिल्हा पोलीस प्रमुख आंकडे या कामासाठी संरक्षण मिळावे अशी मागणी केली होती त्यानुसार हे काम पोलीस संरक्षणात सुरू करण्याचा प्रयत्न केला असता युवराज बापू कांबळे यांनी हे काम वाढवण्याचा प्रयत्न करीत डोक्यात दगड मारून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे व सरकारी कामात अडथळा आणला आहे अशा आशयाची फिर्याद पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे .
           या फिर्यादीत नमूद केल्यानुसार पोलिसांची मदत घेऊन 15 डिसेंबर रोजी सकाळी नऊच्या सुमारास सदर रस्त्याचे रखडलेले काम करण्याचा प्रयत्न करण्यात येत असतानाच युवराज बापू कांबळे व त्याचे कुटुंबीय यांनी सदर काम करण्यास अटकाव केला. हे लोकहिताचे काम आहे आम्हास काम करू द्या अशी समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता युवराज बापू कांबळे यांनी स्वतःला दगडाने मारहाण करून घेतली असून या संपूर्ण प्रसंगाचे चित्रीकरणही करण्यात आल्याचा दावा फिर्यादी मध्ये केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *