गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

विना नंबरच्या वाहनातून वाळू चोरीचा आणखी एक प्रकार पोलीस कारवाईत उघड

         गेल्या काही महिन्यात पंढरपूर तालुक्यातील वाळू चोरांवर कारवाई करत असताना या कारवायांमध्ये ताब्यात घेण्यात येत असलेली विना नंबरची असल्याचे आढळून आले आहे.तर अनेक प्रकरणात पोलीस कारवाई कारण्यासाठी आल्यानंतर हेच विना नंबरचे वाहन जागेवरच सोडून वाळू चोर पसार झाल्याचे प्रकारही घडले आहेत.मात्र एकामागोमाग एक खेपा टाकण्याच्या उद्देशाने अथवा पोलीस कारवाईच्या भीतीने हेच वाळू चोर या विना नंबरच्या वाहनांचा वापर करताना सदर वाहने भरधाव वेगाने चालवत असल्यामुळे सामान्य लोकांच्या जीविताला मात्र धोका उत्पन्न करीत आहेत अशी भीती सर्वसामान्य नागिरक अनेकवेळा व्यक्त करताना दिसून येतात.सदर वाहने जुनी असल्यामुळे व या वाहनांचा किमान थर्ड पार्टी इन्शुरन्सही नसल्याने मोटार वाहन कायद्यानुसार विमा कंपनीकडून जखमी अथवा मृत्यू व्यक्तीच्या कुटूंबास आर्थिक भरपाई मिळणे देखील मुश्किल होऊन बसते.
         आज उपरी येथे वाळू चोरीसाठी अशाच प्रकारे जुन्या विना नंबरच्या ट्रॅक्टर व डम्पिंग ट्रॉलीचा वापर होत असल्याचे आढळून आले.रात्रग्रस्तीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी केलेल्या कारवाईत अर्धब्रास वाळूसह सदर वाहन त्याब्यात घेतले असून या प्रकरणी वाहन चालक  तानाजी मुऴे रा.उपरी ता.पंढरपूर  याच्या विरोधात भा.दं.वि.कलम 379, सह गौण खनिज कायदा 1978 कलम 4(1), 4(क)(1) व 21 प्रमाणे पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *