ताज्याघडामोडी

कासाळ ओढ्याला मिळणार कॅनाॅलचा दर्जा

कासाळ ओढ्याला मिळणार कॅनाॅलचा दर्जा
पंढरपूर तालुक्यातील ७ ते ८ गावे होणार कायमची दुष्काळमुक्त, जलसंपदामंञ्यांनी दिला लेखी आदेश
पंढरपूर – सांगोला तालुक्यातून उगम पावणारा व पंढरपुर तालुक्यातील गार्डी, पळशी, सुपली, उपरी, भंडीशेगाव, शेळवे, वाडीकुरोली या गावातून वाहत जाणारा कासाळ ओढा भीमा नदीला मिसळतो. या ओढयामध्ये वरील सर्व गावांच्या पाणीपुरवठा विहीरी आहेत. त्यामुळे ओढयाला कॅॅॅॅनाॅलचा दर्जा मिळावा अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अरुण आसबे यांनी केली असता तात्काळ जलसंपदामंञी जयंत पाटील यांनी मागणी मंजूर करुन त्याबाबतचे लेखी आदेश संबंधित विभागाला दिले आहेत.
   सांगोला तालुक्यातून उगम पावणा-या कासाळ ओढयामुळे पंढरपूर तालुक्यातील बहुतांश गावे बागायती झाली आहेत. या ओढयामध्ये लोकसहभाग व टाटा ट्रस्टच्या माध्यमातून जलयुक्त शिवारचे कोटयावधी रुपयांचे काम झाले आहे. ओढया शेजारूनच उजनी उजवा कालवा वाहतो. त्यामुळे दरवर्षी उन्हाळयात उजणी कॅनाॅलचे पाणी सोडताना शेतक-यांना अडचणी येतात. ग्रामस्थ रस्त्यावर उतरुन आंदोलन करतात. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा कायमचा प्रश्न मिटविण्यासाठी राष्ट्रवादी युवक काॅग्रेसने जलसंपदामंञ्यांना याबाबत निवेदन दिले.
      सांगली येथे शनिवारी सायंकाळी प्रदेश सचिव अरुण आसबे, पञकार प्रवीण नागणे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांंची भेट घेतली. ओढयाला कॅनाॅलचा दर्जा मिळाल्याने तालुक्यातील ७ ते ८ गावे दुष्काळमुक्त होतील. व ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटेल. याबाबत माहिती दिली असता जलसंपदामंञ्यांनी आपल्या व्यस्त कामामधून स्वःतच्या गाडीच्या बोनेटवर तात्काळ पञावर स्वाक्षरी केली. व सदर पञ अधिक्षक अभियंता साळे यांना देण्याचे सांगून सदर काम तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या. यामुळे तालुक्यातील ही गावे कायमची दुष्काळमुक्त होणार आहेत. जलसंपदामंञ्यांच्या या लेखी आदेशामुळे व राष्ट्रवादी युवकच्या प्रयत्नामुळे शेतक-यांमधून मोठे समाधान व्यक्त केले जात आहे.

पंढरपूर तालुक्यातील उजनी व भाटघर व कॅॅॅॅनाॅललगत असलेल्या इतरही गावामधील ओढे व नाल्यांना कॅनाॅलचा दर्जा मिळवून देण्यासाठी आम्ही पाठपुरवठा करणार आहोत.
अरुण आसबे
प्रदेश सचिव

राष्ट्रवादी युवक काँग्रेस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *