ताज्याघडामोडी

स्वेरीत कोरोनामुक्ती अभियान संपन्न

     पंढरपूर- जिल्हा परिषद सोलापूर अंतर्गत असलेल्या पंचायत समितीपंढरपूर आणि श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटपंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वेरीमध्ये एकदिवसीय कोरोनामुक्ती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्वेरी अंतर्गत असलेल्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व कॉलेज ऑफ फार्मसीच्या पदवीपदविका व पदव्युत्तर पदवी मधील सर्व सदस्यांची कोविड -१९ ची तपासणी करण्यात आली.

         या कोरोनामुक्त अभियानाचे उदघाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी (आयएएस) यांच्या हस्ते व श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटपंढरपूरचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे यांच्या उपस्थितीत पार पडले. स्वेरी अंतर्गत असलेल्या चारही महाविद्यालयांचे प्राचार्यअधिष्ठाताप्राध्यापक वर्गशिक्षकेतर कर्मचारी यांच्या जवळपास तीनशे स्टाफची कोविड-१९ ची तपासणी करण्यात आली. स्वेरीमध्ये असलेली सुरक्षिततादोन स्टाफमध्ये सुरक्षित अंतरमास्क व सेनिटायझर याचा वारंवार वापर व आरोग्याच्या दृष्टीने काटेकोरपणे पालन केले जात असल्याचे दिसून आले. हे अभियान पंढरपूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले व वैद्यकीय अधिकारी डॉ. संध्या पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. भाऊसाहेब जानकरडॉ.अभिजीत रेपाळडॉ.श्रीकांत नवात्रेडॉ.प्रभा साखरेडॉ. अनिसा तांबोळीडॉ. गुंजाळडॉ. शिरीष पाटीलडॉ.बब्रुवान मानेप्रशांत घोडकेतानाजी मल्लावराजू सय्यददीपक चव्हाणसरिता राठोडसंगीता जाधवतालुका अभियान व्यवस्थापक बचत गट विभागाचे सचिन हिरेमठगटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांच्या सह एमआयटी मधील आरोग्य सेवकांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *