ताज्याघडामोडी

वंचितच्या जिल्हा महासचिवांची हत्या; चर्चेला बोलावलं अन्…

जालन्यातून मोठी बातमी समोर येत आहे, वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा महासचिवांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संतोष आढाव असं त्यांचं नाव आहे. जमिनीच्या वादातून ही हत्या करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. संतोष आढाव यांची हत्या त्यांच्या चुलत्यानंच केल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आरोपीला ताब्यात घेतलं […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर सिंहगडच्या ३ विद्यार्थ्यांची ” ४ डायमेन्शन इन्फोटेक” कंपनीत निवड

पंढरपूर: प्रतिनिधी  कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असलेल्या मयुरेश अगाशे, बबन भिसे आणि माधवी शेंडे या तीन विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असल्याची माहिती मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी यांनी दिली. ” ४ डायमेन्शन इन्फोटेक” कंपनी मेकॅनिकल साॅफ्टवेअर डिझाईन डेव्हलपमेंट सोल्युशन्स […]

ताज्याघडामोडी

अनेक घोटाळे उघड करणाऱ्या किरीट सोमय्यांना तीन तरुणांनी घातला गंडा

विविध राजकीय नेते आणि खासकरुन विरोधकांवर विविध घोटाळ्यांचे आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमय्या हे नेहमी चर्चेत असतात. कधी ते त्यांनी केलेल्या आरोपांमुळे तर कधी त्यांच्या आरोपांचे पुढे काय झाले यामुळे चर्चा झडत असते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर सोमय्यांनी विविध आरोप केले. आणि आता हेच मुश्रीफ भाजप-शिंदे सरकारमध्ये मंत्री झाले आहेत. त्यामुळे आता […]

ताज्याघडामोडी

बायकोला विहिरीत ढकललं, मग त्याने स्वत: उडी घेतली, वाचू नये म्हणून पुन्हा बुडवलं अन्

पती-पत्नीच्या वाद विकोपाला जाऊन पतीने पत्नीला विहिरीत ढकलून दिले. स्वतःही विहिरीत उडी मारून पत्नीला बुडविले आणि त्यानंतर स्वतः बुडाला. दारूच्या नशेत पतीने पत्नीला विहिरीत ढकलून देऊन स्वतःही विहिरीत बडून पती-पत्नी, असे दोघे मृत्युमुखी पडल्याची घटना मेटकरवाडी, घेरडी (ता. सांगोला) येथे घडली आहे. या घटनेमध्ये सिद्धाराम सुभाष कारंडे (वय-२८) आणि सोनाली सिद्धाराम कारंडे (वय २५, रा. […]

ताज्याघडामोडी

महाराष्ट्रात पुन्हा अतिमुसळधार पावसाचा इशारा; या जिल्ह्यांना अलर्ट

देशातील पंजाब, दिल्ली, हिमाचल प्रदेश या ठिकाणी पावसाने हाहाःकार माजवलेला आहे. यामुळे अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. महाराष्ट्रात देखील दडी मारलेल्या पावसाने दोन दिवसापासून पुन्हा एकदा चांगली हजेरी लावलेली आहे. पण तरीसुद्धा अद्यापही महाराष्ट्रातील असे काही जिल्हे आहेत, ज्या ठिकाणी शेतकरी राजा हा चातकाप्रमाणे पावसाची वाट त आहे. जुलै महिन्याचा शेवट जवळ […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

टोमॅटोतून ३० लाख रुपयांची कमाई करणाऱ्या शेतकऱ्याला अज्ञातांनी संपवलं; हत्येचं कारण ऐकून पोलिसही चक्रावले

आंध्र प्रदेशमधून धक्कादायक वृत्त हाती आलं आहे. आंध्र प्रदेशमध्ये अन्नामय्या जिल्ह्यात एका टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याला लुटण्यासाठी आलेल्या हल्लेखोरांनी हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याची हत्या मंगळवारी रात्री करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी केला आहे. शेतकरी नरेम हा गावात दूध द्यायला जात होता, त्यावेळी नरेम यांना हल्लेखोरांनी रोखलं. त्यानंतर त्याचे हात-पाय […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

मी तुझी फक्त मैत्रीण, पुण्यात ३७ वर्षीय महिलेचं २६ वर्षीय तरुणाला उत्तर, त्याने बर्निंग घाटात तिला…

एकतर्फी प्रेमातून तरुणीवर कोयत्याचे वार असो, किंवा दर्शना पवार हत्याकांड. यासारख्या घटना पुणे शहरात ताज्या असताना एकतर्फी प्रेमातून तरुणाने तरुणीला मारहाण करून तिचे डोके फोडल्याचे समोर आले आहे. ही घटना कोरेगाव पार्क येथील बर्निंग घाट परिसरात घडली. ‘तू मला भेटत का नाहीस?’ अशी विचारणा करून तरुणाने तरुणीला दांडक्याने मारहाण केली. ‘मी तुझी फक्त मैत्रीण राहू […]

ताज्याघडामोडी

सिंहगडच्या सिव्हिल इंजिनिअरिंग मधील ५ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड

पंढरपूर: प्रतिनिधी कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयातील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागात शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असतानाच ५ विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली असल्याची माहिती सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डाॅ. श्रीगणेश कदम यांनी दिली.    कॅशेक इंजिनिअर्स प्रा. लि. या कंपनीची स्थापना १९९५ साली पुणे येथे करण्यात आली असून हि कंपनी सागरी प्रकल्प, […]

ताज्याघडामोडी

एकटे अजित पवार नाही, तर राष्ट्रवादीचे तीन बडे नेते दिल्लीत दाखल, मोठ्या हालचाली

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आता दिल्लीत दाखल झाले आहेत. महाराष्ट्रात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटपाचा तिढा सुटला नसल्याने आता दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर अजित पवार दिल्लीला रवाना झाल्याची बातमी समोर आली होती. अजित पवार यांच्यासोबत त्यांच्या पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल हे दिल्लीला रवाना झाल्याची माहिती समोर आलेली. पण अजित पवार […]

ताज्याघडामोडी

कर्मयोगी इन्स्टिट्यूट च्या चार विद्यार्थ्यांची निवड

कर्मयोगीचे प्लेसमेंट मधील सातत्य कायम. श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (अभियांत्रिकी) महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील अंतिम वर्षा मधील चार विद्यार्थ्यांची मेटा इंगिटेक या नामांकित कंपनी मध्ये निवड झाली असून त्यांना वार्षिक 3.36 लाख रुपयांचे पॅकेज मिळाले आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी दिली. पुणे येथील मेटा इंगिटेक या […]