गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

बकऱ्यांच्या शेडमध्ये लपून बसलेल्या बहिणीचा दोन सख्या भावांकडून खून, धक्कादायक कारण

काही वर्षांपूर्वी सैराट हा चित्रपट प्रचंड गाजला होता. आंतरजातीय प्रेमसंबंध असल्यामुळं भावांनी बहिणीचा खून केल्याची घटना त्यामध्ये दर्शविली होती. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका गावात याच घटनेची पुनरावृत्ती झाल्याचं दिसून आलंय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सैराटसारखी धक्कादायक घटना घडलीय. प्रेम संबंध असल्याच्या आरोपातून दोन सख्या भावांनी बहिणीच्या डोक्यात कुऱ्हाड घालून ठार केलंय. या प्रकरणी आरोपींना […]

ताज्याघडामोडी

प्रियकरासाठी लाखोंचं कर्ज काढलं, कार घेतली, त्यानं हफ्ते थकवले अखेर तिनं टोकाचं पाऊल उचललं अन् सर्व संपलं…

कर्ज काढून घेतलेली कार आणि प्रियकरासाठी सुमारे पावणेचार लाख रुपयांच्या काढलेल्या कर्जाचे हप्ते न फेडल्याने आयटी कंपनीत नोकरी करणाऱ्या तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तरुणीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून प्रियकराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी संबंधित युवकाला अटक केली आहे. तरुणीने प्रियकराच्या सांगण्यावरून कर्ज काढून त्याला पैसे दिले होते. […]

ताज्याघडामोडी

ठाकरे गटाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल, थेट सिडकोला गंडा, तब्बल 60 कोटींची फसवणूक

पनवेलमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या जिल्हाध्यक्षाने सिडकोला 60 कोटींचा गंडा घातल्याची माहिती समोर आली आहे. शिरीष घरत असं या जिल्हाध्यक्षाचं नाव आहे. ते ठाकरे गटाचे रायगड जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांच्यावर बेलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. संबंधित प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली […]

ताज्याघडामोडी

नवीन उद्योग सुरू करताना धाडस महत्वाचे- सुहास अदमाने

पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मध्ये “इंजिनिअर्स डे” कार्यक्रम उत्साहात संपन्न पंढरपूर: प्रतिनिधी सध्या प्रत्येक क्षेत्रात खुप स्पर्धा निर्माण झाल्या आहेत. उद्योजकांना नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करायचे असते. उद्योगात, व्यवसायात प्रेझेंटेशन तसेच वेळेला खुप महत्त्व असते. य मध्ये योग्य नियोजन करून वाटचाल केल्यास यश निश्चित भाटते. याशिवाय व्यवसायात मोठ्या लोकांच्या ओळखी होतात. व्यवसायातील वाईट प्रसंग आहेत. व्यवसायात […]

ताज्याघडामोडी

फॅबटेक टेक्निकल कॅम्पस मध्ये प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

परिश्रमाशिवाय पर्याय नाही- कॅम्पस डायरेक्टर डॉ .संजय आदाटे सांगोला: फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड रिसर्च, मध्ये प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचेउत्साहात स्वागत करण्यात आले,या स्वागत समारंभात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे मा.प्राचार्य सुनील नष्टे, मा.श्री.बाळासाहेब शिंदे,मा.श्री.नदाफ नबीसाहेब व श्रीमती सय्यद.एस.जी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे मा.प्राचार्य सुनील नष्टे म्हणाले की जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला चांगले शिक्षण मिळते चांगल्या […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

सासूच्या टोमण्यांना सून वैतागली, पुण्यात २२ वर्षीय विवाहितेने आयुष्य संपवलं

लग्न झाल्यानंतर सुनेचा सासूशी होणारा वाद काही नवीन नसतो, परंतु सासूचे टोमणे आणि छळ टोकाला गेले, की याचे परिणाम काय होऊ शकतात, याचं उदाहरण ही बातमी वाचून तुम्हाला कळेल. खडक पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या एका विवाहितेने सासूच्या छळाला कंटाळून विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आला आहे. लग्नाच्या एका वर्षानंतर ही घटना […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पतीला सरकारी नोकरी लावतो, समस्या दूर करतो.. महिला पोलिसावर भोंदूबाबा आणि साथीदारांचा अत्याचार

भोंदूबाबांनी महिला पोलिस कर्मचाऱ्यावर लैंगिक अत्याचार आणि लुबाडणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सन २०१८पासून हा प्रकार सुरू होता. अखेर याविरोधात तक्रार केल्यानंतर तलासरी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. तक्रारदार महिला ही पोलिस असून, तिच्या पतीच्या माध्यमातून भोंदूबाबाशी ओळख झाली. पतीला सरकारी नोकरी लागेल, तसेच घरगुती समस्या दूर होतील, असे तिला सांगण्यात आले. त्यानंतर […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

ठाकरे गटाच्या युवती सेनेच्या महिलेची मुलांसमोरच चाकूने भोसकून हत्या

कुरखेडा येथील शिवसेना ठाकरे गटाच्या युवती सेनेची शहर प्रमुख राहत सय्यद यांची पतीने मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास दोन मुलांच्यासमोर चाकूने भोसकून हत्या केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.त्यामुळे सध्या राज्यात या प्रकरणाची आता जोरदार चर्चा सुरू असून आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कुरखेडा येथील निष्ठावान शिवसैनिक नजद गुलाब सैय्यद यांची मुलगी तथा ठाकरे गटाच्या […]

ताज्याघडामोडी

राज्यावर उद्या अस्मानी संकट, ‘या’ भागांना हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी

राज्यात दडी मारलेला मान्सून आता पुन्हा सक्रीय झाला असून यामुळे पुढचे काही दिवस पावसाचे असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. अशात हवामान खात्याने १६ सप्टेंबरला मध्य महाराष्ट्रात रेड अलर्ट जारी केला आहे. यावेळी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये तुफान पाऊस होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रामध्ये हवामान खात्याकडून रेड […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

चौथीतील मुलीकडं रोज पैसे येऊ लागल्यानं पित्याला संशय, शाळेतील ‘त्या’ कारनाम्यानं हादरले पालक

वसईतील एका शाळेमध्ये चौथीत शिकणाऱ्या मुलीकडं खाऊ खाण्यासाठी रोज पैसे जास्त येत असल्यानं पालकांना शंका आली. मुलीकडं दररोज पैसे कुठून येतात, याची खात्री करण्यासाठी मुलीचे पालक शाळेत गेले. तेव्हा राजाराम मौर्य हा तिला खाऊचे आमिष दाखवून लैगिंक चाळे करीत असल्याचे समजले. पीडित मुलीच्या नातेवाईकांनी हे वालीव पोलिसांना सांगितलंय. घटनेमुळं संतप्त नागरिकांनी शाळेत मोठा संतप्त जमाव […]