ताज्याघडामोडी

प्रियकरासाठी लाखोंचं कर्ज काढलं, कार घेतली, त्यानं हफ्ते थकवले अखेर तिनं टोकाचं पाऊल उचललं अन् सर्व संपलं…

कर्ज काढून घेतलेली कार आणि प्रियकरासाठी सुमारे पावणेचार लाख रुपयांच्या काढलेल्या कर्जाचे हप्ते न फेडल्याने आयटी कंपनीत नोकरी करणाऱ्या तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तरुणीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून प्रियकराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी संबंधित युवकाला अटक केली आहे. तरुणीने प्रियकराच्या सांगण्यावरून कर्ज काढून त्याला पैसे दिले होते. कर्जाचे हप्तेही प्रियकरच फेडणार होता. त्याने सांगितल्याप्रमाणे हप्ते न फेडल्याने तरुणीने आत्महत्येचे पाऊल उचलले, अशी तक्रार तरुणीच्या आईने दिली आहे.

राणी उर्फ रसिका दिवटे (वय २५) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी तरुणीच्या आईने हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. प्रियकर आदर्श अजयकुमार मेनन (वय २५) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या तरुणीचे आणि मेनन याचे जानेवारी २०२३ पासून प्रेमसंबंध होते. तरुणी बी. टी. कवडे रस्त्यावर आईसोबत राहत होती. तर,आदर्श मेनन हा मांजरी येथे राहता होता. ती अधून-मधून प्रियकराच्या घरी जात होती.

तरुणीने कर्ज काढून कार खरेदी केली होती. तरुणीनं खरेदी केलेली ती कार मेनन हाच वापरत होता. तसेच, तरुणीने त्याच्या सांगण्यावरून क्रेडीट कार्ड, पर्सनल लोन आणि पाच ते सहा ठिकाणाहून ऑनलाइन कर्ज घेतले होते. त्याची एकूण रक्कम तीन लाख ७५ हजार रुपये होती. आरोपीने तरुणीला दिलेल्या शब्दाप्रमाणे कर्जाचे हप्ते फेडले नाहीत. त्यावरून त्या दोघांमध्ये वारंवार भांडणे होत होती. १४ सप्टेंबरच्या दिवशी तरुणीने आरोपी मेनन याच्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *