गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

मित्राकडे दारुसाठी पैसे मागितले; नकार दिल्याने तरुणाला राग अनावर, संतापात धक्कादायक कृत्य

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग अनावर झाल्याने मद्यपीने तरुणाची सुर्‍याने भोसकून हत्या केल्याचा प्रकार रविवारी रात्री ठाण्याच्या वागळे इस्टेट येथील रामनगरमध्ये घडला. विजय चौहान (२९) असे मृत तरुणाचे नाव असून या प्रकरणी आरोपी सनी बैद (३२) याला श्रीनगर पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वागळे इस्टेट येथील रामनगर परिसरात राहणारा मृत विजय रविवारी रात्री […]

ताज्याघडामोडी

साहेबांच्या गाडीसह १ कोटी घेऊन चालक फरार, मोबईल फेकला, लोकेशन बदललं, पण…

१७ वर्षांपासून विकासकासाठी काम करणाऱ्या चालकाला अकोल्यातून अटक करण्यात आली आहे. हा चालक त्याच्या मालकाचे १.०६ कोटी रुपये घेऊन पळून गेला होता. पोलिसांनी सांगितले की, आरोपी संतोष चव्हाण याने आपला मोबाईल फोन बंद केला होता, तर लोकेशन कळू नये म्हणून तो वेगवेगळी वाहनंही बदलत होता. त्यामुळे तो सीसीटीव्हीपासूनही वाचत राहिला. ही चोरी ११ ऑक्टोबर रोजी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

तरुण पत्नीकडे पाहत असल्याचा संशय, हातात सुरा घेत पोलिसाने माजवली दहशत, पोलीस दाम्पत्य निलंबित

कोल्हापुरातील पाचगाव येथील गाडगीळ कॉलनी परिसरात एका पोलीस कर्मचाऱ्याने एक तरुण आपल्या पत्नीकडे बघत असल्याच्या संशयावरून हातात सुरा घेत परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न करत मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. याबाबतचा व्हिडिओ देखील सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला होता. दरम्यान फिर्यादीने केलेल्या तक्रारीनुसार याप्रकरणी पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांनी यांनी कडक कारवाई करत सदर पोलीस […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

मोबाईलवरुन वाद, बीपी वाढल्याने आई बेशुद्ध पडल्याचा दावा, पोस्टमार्टम करताच मुलाचे पितळ उघडं पडलं, अन्..

नागपूर शहरातील संत गजानन महाराज नगर येथे मुलानेच आईचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घडली. रामनाथ वडवाईक असे आरोपी मुलाचे नाव आहे. रामनाथ गुलाबराव बडवाईक याने दारूच्या नशेत स्वत:ची आई कमलाबाई गुलाबराव बडवाईक यांची हत्या केली. लहान भावाला आईच्या गळ्यावर जखमा दिसल्याने हा प्रकार उघडकीस आला. याबाबत अधिक माहिती अशी की, कमलाबाईला ३ मुले आहेत […]

ताज्याघडामोडी

मोठी स्वप्न बघा, विद्यार्थ्यांनी ध्येय वेडे असले पाहिजे- भाऊसाहेब रुपनर

फॅबटेक इंजिनिअरिंग मध्ये राष्ट्रीय टेक्नोफॅब २३ उत्साहात संपन्न सांगोला :- फॅबटेक टेक्निकल कॅम्पस ,कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड रिसर्च मध्ये टेक्नोफॅब २३ या राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन २१ ऑक्टोबर २०२३ रोजी करण्यात आले होते.या स्पर्धेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे टॉप गियर ट्रान्समिशन प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक,मा.श्री.श्रीकांत पवार ,तर  प्रमुख उपस्थिती प्रा. बी. डी गायकवाड ,(मेकॅनिकल विभाग,स्वेरी कॉलेज), प्रा. भीमाशंकर पैलवान […]

ताज्याघडामोडी

चेहऱ्यावर गरम पाणी ओतले; नंतर कपडे जाळले, पतीला कंटाळून पत्नीने घर सोडलं, नंतर जे घडलं ते वाचून बसेल धक्का

सध्या नवरात्रमुळे सर्वत्र स्त्री शक्तीचा जागर सुरू असताना अमरावती जिल्ह्यात एका संशयी वृत्तीच्या पतीने पत्नीच्या चेहऱ्यावर गरम पाणी ओतले. त्यांचे कपडेसुद्धा जाळले. माहेरवरून पैसे आणण्यासाठी त्यांना बेदम मारहाण केली. या अतोनात छळाला कंटाळून पत्नी भावाकडे गेल्यावर पतीनेच ती घरातून पळाल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली. त्यामुळे पत्नीने गाडगेनगर ठाण्यात तक्रार दाखल करून संपूर्ण आपबिती पोलिसांसमोर कथन […]

ताज्याघडामोडी

तिसंगी तलाव भरून घेणार-आ समाधान आवताडे

10 नोव्हेंबर ला आवर्तन सुटणार प्रतिनिधी  वीर भाटगर धरणातून नीरा उजवा कालव्याद्वारे पाणी सोडण्यात येणार असून त्या लाभक्षेत्रातील 9 गावांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे अशी माहिती आ समाधान आवताडे यांनी बोलताना दिली  रब्बी हंगाम २०२३-२४ मधील खडकवासला, पवना,भामा, आसखेड, चासकमान प्रकल्प तसेच नीरा उजवा व डावा कालवा प्रकल्प सल्लागार समिती सदस्यांची व सिंचन पाण्याचे नियोजन […]

ताज्याघडामोडी

संजय शिरसाठ यांच्याकडून गृहमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली, मंत्रालयाच्या गेटवरच घातला गोंधळ

आमदार संजय शिरसाठ काल मंत्रालयात जात असताना त्यांचे वाहन थांबण्यात आले होते. तसेच त्यांना दुसऱ्या गेटने जाण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र यावेळी शिरसाठांनी मंत्रालयाच्या गेटवर संताप व्यक्त केला आणि गेटवरील पोलिसांशी हुज्जत घातली. मंत्री दादा भुसे यांच्या मध्यस्थीनंतर वाद मिटला, या सर्व घटनेनंतर आता गृहमंत्र्यांच्या आदेशालाच शिवसेना आमदार केराची टोपली दाखवत असल्याच्या चर्चा रंगल्यात. […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

तूर कापसाच्या लागवडीसह शेतकऱ्याचा भलताच उद्योग, पोलीस शेतात पोहोचले अन् बेड्या ठोकल्या

नाशिक येथील ललीत पाटील ड्रग्स प्रकरण गाजत असतानाच धुळे जिल्हा पोलीस प्रमुख संजय बारकुंड यांनी अंमली पदार्थ तस्करी विरोधात कंबर कसले आहे. पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग आणि थाळनेर पोलिसांनी केलेल्या दोन कारवाई करत सुमारे १ कोटी ५ लाखांचा गांजा जप्त केला आहे. त्यामुळे गांजाची शेती करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. भुईमूग, […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

गरबा खेळताना दंड थोपटला; दोन गटात वाद, नंतर तरुणाला भेटण्यास बोलवलं, अन् नको ते घडलं

गरबा खेळण्याच्या ठिकाणी आणि दंड थोपटल्याच्या कारणावरून बुधवारी रात्री दोन गटात वाद झाला. या वादाचे रूपांतर नंतर तुंबळ हाणामारीत झाले. यात एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर हल्ला चढविण्यात आला. शिवाय घटनास्थळावर फायरिंग झाल्याचा संशय आहे. याप्रकरणी धुळे शहरातील भाजपा नगरसेविकेचा मुलगा मित भामरे याच्यासह अन्य दोघांवरही खुनाचा प्रयत्न केल्याने गुन्हा दाखल झाला आहे. […]