ताज्याघडामोडी

संजय शिरसाठ यांच्याकडून गृहमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली, मंत्रालयाच्या गेटवरच घातला गोंधळ

आमदार संजय शिरसाठ काल मंत्रालयात जात असताना त्यांचे वाहन थांबण्यात आले होते. तसेच त्यांना दुसऱ्या गेटने जाण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र यावेळी शिरसाठांनी मंत्रालयाच्या गेटवर संताप व्यक्त केला आणि गेटवरील पोलिसांशी हुज्जत घातली. मंत्री दादा भुसे यांच्या मध्यस्थीनंतर वाद मिटला, या सर्व घटनेनंतर आता गृहमंत्र्यांच्या आदेशालाच शिवसेना आमदार केराची टोपली दाखवत असल्याच्या चर्चा रंगल्यात.

गेल्या काही दिवसांत मंत्रालयात शेतकऱ्यांनी आंदोलने केली. काही शेतकऱ्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. मंत्रालयात होणारी गर्दी आणि शेतकऱ्यांनी केलेलं आंदोलन, यालाच अनुसरून काही दिवसांपूर्वी गृह विभागाने मंत्रालयाच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित करत नवीन नियमावली जारी केली होती.या नव्या नियमावलीमध्ये कॅबिनेट मंत्री आणि मुख्य सचिव यांनाच मंत्रालयाच्या मुख्य दरवाजाने सोडण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर अन्य आमदार आणि शासकीय अधिकाऱ्यांना गार्डन प्रवेश द्वारातून प्रवेश देण्यात आलेला आहे. असे असताना कॅबिनेट बैठकीच्या दरम्यान संजय शिरसाठ हे मुख्य गेटने आत जात असताना पोलिसांनी त्यांचे वाहन अडवले होते.

मुख्य गेटने आत न सोडल्याने संजय शिरसाठ यांनी मंत्रालयाच्या गेटवर थयथयाट केला. यावेळी संजय शिरसाठ यांनी पोलिसांशी हुज्जत घालत याच दरवाजाने आत जाण्याचा आग्रह धरला. येथून जाऊन न दिल्आस एकाही मंत्र्याचे वाहन बाहेर पडू देणार नाही, असे म्हणत गाडी गेटवर आडवी लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला.याचवेळी कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांची आपल्या वाहनाने मंत्रालयातून बाहेर होते. त्यावेळी दादा भुसे यांनी हा वाद मिटवला. पुढे अखेर संजय शिरसाठ हे मुख्य गेटनेच मंत्रालयात दाखल झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *