राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांबाबत आक्षेपार्ह पोस्ट करण्यावर बारामतीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ ट्विटरवर शेफाली वैद्या नावाच्या ट्विटर वापरकर्त्याने शेअर करत किती खोटं बोलणार असे म्हटले होते. याच व्हिडिओवर वेदश्री नावाच्या ट्विटर वापरकर्त्या तरुणीने पवारांबाबत आक्षेपार्ह ट्विट केले होते. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अभिजीत जाधव आणि त्यांच्ये मित्र अजित […]
ताज्याघडामोडी
गजानन मारणे स्वत:ला रॉबीनहूड समजतो काय ?
गुंड गजा मारणे यास पौड पोलीस ठाण्याच्या मोकाच्या गुन्हयातून न्यायालयाने 15 फेब्रुवारी रोजी मुक्त केले होते. तळोजा मध्यवर्ती कारागृहातून सुटल्यावर त्याने समर्थकांसह भव्य रॅली काढली होती. यामध्ये कायद्याचे उल्लंघन करण्यात आले होते, तसेच रॅलीचे व्हिडिओ व स्टेटस टाकत त्याच्या समर्थकांनी प्रसिध्दी दिली होती. गजा मारणेवर खुन, मारामारी, खंडणी आदी गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असून परस्परविरोधी […]
.. अन्यथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरावर मोर्चा काढा
आपलं सरकार असतानाही अनुसूचित जाती-जमाती आणि मागासवर्गीयांवर अन्याय होत असेल तर रस्त्यावर उतरा. अपेक्षित न्याय मिळवण्यासाठी आक्रमक आंदोलन करा. कोणताही अन्याय सहन करू नका, असा सल्ला अखिल भारतीय काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष आणि राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिला आहे. नितीन राऊत यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. […]
रुग्णांकडून पैसे लाटणारा डॉक्टर ‘एसीबी’च्या जाळ्यात
महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत रुग्णावरील उपचारासाठी मागितले पैसे तळेगाव दाभाडे – सोमाटणे फाटा येथील पवना हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जनारोग्य योजनेंतर्गत संपूर्ण मोफत औषधोपचार केले जातात. मात्र रुग्णाच्या नातेवाईकाकडून नऊ हजार रुपयांची लाच घेताना डॉक्टर व खासगी व्यक्तीला रंगेहाथ पकडले. पवना हॉस्पिटलमध्ये मंगळवारी (दि. 23) सायंकाळी 4 वाजता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. डॉ. […]
कोरोनाच्या उद्रेकानंतर केंद्राकडून नवी नियमावली, 30 एप्रिलपर्यंत हे निर्बंध लागू
मुंबई : जिल्हा स्तरावर निर्बंध लादण्याच्या केंद्र सरकारने राज्यांना सूचना दिल्या आहेत. तर राज्यव्यापी लॉकडाऊन लावता येणार नाही, असेही केंद्राने स्पष्ट केले आहे. गृहमंत्रालयाने मंगळवारी याबाबत नवी मार्गदर्शक तत्व जारी केली आहे. नवी नियमावलीनुसार जिल्हा, उपजिल्हा, शहर आणि प्रभाग स्तरावर निर्बंध लादले जाऊ शकतात असे सूचित केले आहे. ही नियमावली 30 एप्रिलपर्यंत लागू असेल, असे स्पष्ट […]
२००९ ला स्व.आ.भालकेंचा एकतर्फी विजय तर २०१४ आणि १९ ची विधानसभा लढत झाली होती अटीतटीची !
२५२ पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाच्या १७ एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणुकीत पंढरपूर शहर व मतदार संघात समाविष्ट असलेल्या तालुक्यातील २२ गावातून पुन्हा मागील २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीप्रमाणे चुरशीने मतदान होणार का ? याची चर्चा होत असतानाच या पोटनिवडणुकीत स्व.भारत भालके यांच्या निधनामुळे निर्माण झालेली सहानुभूती भगीरथ भालके याना मताधिक्य मिळवून देईल असा विश्वास भालके समर्थक व्यक्त […]
सरकारने लाईट तोडलीय,आमची पिकं जळून चाललेत अन तुम्ही आम्हास त्रास देता !
पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस पुन्हा वाढत चालल्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बध लादले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न करणाऱ्या पादचाऱ्याकडून तसेच वाहन चालकांकडून दंड वसुली केली जात आहे.पंढरपूर शहर व शहराबाहेर अनेक महत्वाच्या रस्त्यावर वाहुतक शाखा व इतर पोलीस कर्मचारी थांबून विना मास्क असलेल्या नागिरकांवर कारवाई […]
पंढरपूर पोटनिवडणूकीसाठी एक उमेदवारी अर्ज दाखल 22 इच्छुकांनी घेतले 24 उमेदवारी अर्ज
पंढरपूर पोटनिवडणूकीसाठी एक उमेदवारी अर्ज दाखल 22 इच्छुकांनी घेतले 24 उमेदवारी अर्ज पंढरपूर. 23:- पंढरपूर विधानसभा पोटनिवडूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी संतोष महादेव माने (अपक्ष) यांचा एक उमेदवारी अर्ज दाखल झाला असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूकीसाठी 23 मार्च 2021 रोजी 22 इच्छुक उमेदवारांनी 24 […]
स्वेरी नेहमीच विद्यार्थी हिताला प्राधान्य देते – प्रा. उज्वला पाटील स्वेरीत ‘सायन्स ओरिएन्टेशन प्रोग्राम-२०२१’ संपन्न
स्वेरी नेहमीच विद्यार्थी हिताला प्राधान्य देते – प्रा. उज्वला पाटील स्वेरीत ‘सायन्स ओरिएन्टेशन प्रोग्राम-२०२१’ संपन्न पंढरपूर– ‘सध्याची बदलत जाणारी शिक्षण पद्धत पाहता भविष्यात आम्हा शिक्षकांना राष्ट्र निर्मिती करत असताना काळाची गरज ओळखणे आवश्यक आहे. त्यामुळे अत्यंत जलद गतीने पुढे जाणारे शैक्षणिक धोरण आणि त्यातील आधुनिकीकरण यातील बदलाचा स्वीकार करणे गरजेचे आहे. आजच्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीबद्दल फारसे सखोल ज्ञान नसते. […]
शैला गोडसेंचा आक्रमक संघर्ष विचारात घेत राजकीय पुनर्वसन केले जाणार ?
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील जनतेच्या विविध प्रशांसाठी गेल्या काही वर्षांपासून पायाला भिंगरी बांधून ग्रामपंचायत पातळीपासून ते थेट मंत्रालया पर्यंत पाठपुरावा करून विविध प्रश्नांना वाचा फोडणार्या शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शैलाताई गोडसे यांना शिवसेनेच्या हक्काच्या पंढरपूर विधासभा मतदार संघातून उमेदवारी मिळणार हे निश्चित मानले जात होते. स्वतः शैला गोडसे यांनीही २०१९ ची विधानसभा निवडणूक लढवायच्या दृष्टीकोनातुन […]