ताज्याघडामोडी

.. अन्यथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरावर मोर्चा काढा

आपलं सरकार असतानाही अनुसूचित जाती-जमाती आणि मागासवर्गीयांवर अन्याय होत असेल तर रस्त्यावर उतरा. अपेक्षित न्याय मिळवण्यासाठी आक्रमक आंदोलन करा. कोणताही अन्याय सहन करू नका, असा सल्ला अखिल भारतीय काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष आणि राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत  यांनी दिला आहे. नितीन राऊत यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.

  देशभरात सद्या आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. अशातच, पदोन्नतीसाठी देखील आरक्षण लागू करण्यात यावी अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून केली जात आहे. दरम्यान, आता या मुद्द्यामुळे महाविकास आघाडीतील सहकारी पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील धुसफूस समोर आली आहे.पदोन्नतीमध्ये आरक्षणाचा समावेश करण्यावरून नितीन राऊत यांनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. तसेच, उपमुख्यमंत्री व पदोन्नतीतील आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्याचं आवाहन केलं आहे. ते इतक्यावरच थांबले नाहीत, तर मागवर्गीयांच्या या हक्कासाठी स्वतः देखील या आंदोलनात सहभागी होण्याची तयारी नितीन राऊत यांनी दर्शवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *