ताज्याघडामोडी

सरकारने लाईट तोडलीय,आमची पिकं जळून चाललेत अन तुम्ही आम्हास त्रास देता !

पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस पुन्हा वाढत चालल्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बध लादले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न करणाऱ्या पादचाऱ्याकडून तसेच वाहन चालकांकडून दंड वसुली केली जात आहे.पंढरपूर शहर व  शहराबाहेर अनेक महत्वाच्या रस्त्यावर वाहुतक शाखा व इतर पोलीस कर्मचारी थांबून विना मास्क असलेल्या नागिरकांवर कारवाई करीत असतानाच अनेक ठिकाणी वादाचे प्रसंगही उदभवत आहेत.
         पंढरपूर -टेम्भूर्णी रस्त्यावरील अहिल्या चौक भटुंबरे येथे असाच प्रकार घडला असून बुलेट वरून पंढरपूर शहराकडे येत असलेल्या व्यक्तीने पोलीस कारवाई सुरु असल्याचे लांबून पाहताच तोंडास रुमाल बांधला.मात्र पोलीस कर्मचाऱ्यांनी हि बाब लांबूनच हेरली आणि त्यास गाडी बाजूला घेत दंड भरण्यास सांगितले असता मी मास्क घातला आहे असे जोरजोरात ओरडत त्या व्यक्तीने दंड भरण्यास नकार देत पोलीस कर्मचाऱ्यांशी वाद घालण्यास सुरुवात केली.व एकीकडे सरकारने आमची लाईट तोंडलीयं,पीक जळून चललीत म्हणून मोठं मोठ्याने वाद घालू लागला त्यामुळे त्या ठिकाणी ५० ते ६० लोक गोळा झाले. 
    या प्रकरणी शंकर शामराव आटकळे वय 44 रा शेगाव दुमाला ता पंढऱपुर यांच्या विरोधात कारवाईसाठी थांबलेल्या पोलीस कर्मचाऱ्या  समक्ष आरोपीने खिशातील रुमाल काढुन बांधल्याने त्यांना आडवुन विनामास्क बाबत मा.जिल्हाधीकारी सो सोलापुर यांनी काढलेल्या आदेशाबाबत सांगुन त्या प्रमाणे दंड भऱण्यास सांगीतला असता दंड न भरता त्यांनी मोठ्याने ओरडत मी मास्क घातलेला आहे असे सांगुन तुम्हाला काय करायचाय ते करा मी तुम्हाला बघुन घेतो, असे म्हणुन आमचे सरकारी कामात आडखळा आणला म्हणुन भा.द.वि.कलम 269,270,189,188,186,506 आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 51 (ब) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *