ताज्याघडामोडी

श्री दत्त दिगंबर पीठ संस्थान छञपती संभाजीनगर चा प्रतिष्ठेचा मानाचा यंदाचा धर्मभुषण पुरस्कार काकासाहेब बुराडे यांना जाहीर….

दि ११ _
संभाजीनगर येथील श्री दत्त दिगंबर पीठ संस्थान तर्फ दर वर्षी दत्त जयंती दिवशी सर्व समाजातील समाजिक कार्य करणाऱ्या समाज सेवकांचा मानाचा व प्रतिष्ठेचा धर्म भुषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो
यंदाचा धर्मभुषण पुरस्कार..
भारतीय नरहरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष पंढरपूर चे समाजसेवक काकासाहेब सुमनबाबुराव बुराडे सोनार यांना जाहीर झाला आसून
येत्या १४ तारखेला दत्त जयंती दिवशी छञपती संभाजीनगर येथे एका विशेष कार्यक्रमात संत . महंत पञकार व सर्व समाज बांधवाच्या उपस्थित श्री. श्री. श्री. १००८ महामंडलेश्वर सद्गुरू दत्तात्रय महाराज दहिवाळ यांच्या हस्ते तो त्यांना देण्यात येणार आहे…
या पुर्वी हा पुरस्कार समाजातील मातब्बर मान्यवर मलजी भाई ठक्कर.
फत्तेचंदजी रांका. रामराव महाराज ढोक. राजेंद्रजी डहाळे. किरणशेठ आळंदीकर. सुवर्णाताई ठाकरे तसेच अनेक संत महंतांना देवून गौरविण्यात आले आहे
ब्रम्ह वृदांच्या उपस्थित शांती मंञ पठणात पुष्प वृष्टी करत हा पुरस्कार प्रदान केला जातो…
हे या पुरस्काराचे आगळे वेगळे वैशिष्ट्य आहे
सर्व शाखीय सोनार समाजाच एकञीकरण व श्री संत नरहरीमहाराज सोनार यांचा प्रचार व प्रसाराचे तन मन धनाने निस्वार्थ भावनेन विधायक कार्य करणारा कट्टर नरहरीभक्त म्हणून काकासाहेब बुराडे यांची सर्व शाखीय सोनार समाजात महाराष्ट्रा सह इतर राज्यात ओळख आहे . त्यांच्या कार्याची सर्व शाखीय सोनार समाजातील विविध मान्यवरांनी दखल घेत त्यांना कनकरत्न .
सोनारसमाज रत्न. सोनार समाजभुषण. आदी पुरस्कारांनी या पुर्वी सन्मानित करण्यात आले होते
भारतीय नरहरी सेनेच्या माध्यमांतून ते समाजातील तळागाळापर्यंत कार्यरत आहेत.
माहाराजांची जन्म व कर्मभूमी पंढरीत श्री संत नरहरीमहाराज सोनार चौक व न पा सभागृहात श्री संत नरहरीमहाराज यांची तस्वीर लावण्यात तसेच.
पुण्यतिथी ऐवजी हरीऐक्य सायुज्य समाधी सोहळा साजरा व्हावा या साठी त्यांनी पुढाकार घेतला आसून
संत नरहरीमहाराज सोनार चौकात महाराजांचा नऊ फुट उंचीचा पुर्णाकृती पुतळा व त्यांचे भव्य स्मारक उभे करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
श्री संत नरहरीमहाराज सोनार यांचा खरा इतिहास मालुतारण ग्रंथा आधारे समाजा पुढे मांडण्याचा त्यांचा सततचा प्रयत्न आसतो आशा निस्सीम व कट्टर नरहरीभक्तास धर्मभुषण पुरस्कार जाहीर होताच अनेकांनी त्यांचे समक्ष भेटून व दुरध्वनी द्वारे अभिनंदन केले….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *