ताज्याघडामोडी

गजानन मारणे स्वत:ला रॉबीनहूड समजतो काय ?

गुंड गजा मारणे यास पौड पोलीस ठाण्याच्या मोकाच्या गुन्हयातून न्यायालयाने 15 फेब्रुवारी रोजी मुक्त केले होते. तळोजा मध्यवर्ती कारागृहातून सुटल्यावर त्याने समर्थकांसह भव्य रॅली काढली होती. यामध्ये कायद्याचे उल्लंघन करण्यात आले होते, तसेच रॅलीचे व्हिडिओ व स्टेटस टाकत त्याच्या समर्थकांनी प्रसिध्दी दिली होती. गजा मारणेवर खुन, मारामारी, खंडणी आदी गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असून परस्परविरोधी टोळीच्या वर्चस्ववादातून अनेकांचे खून झाले आहेत.

यावर आज उपरोधिक सवाल मुंबई उच्च न्यायालयाने आज तळोजा तुरुंगातून सुटका झाल्यावर समर्थकांसह मिरवणूक आणि हुल्लडबाजी केल्याचा आरोप असलेला आरोपी गजानन मारणे रॉबिनहूड आहे का, असा उपरोधिक सवाल विचारला आहे. तुरुंगातील बंदींना कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून न्यायालय पॅरोल देत आहे आणि तुम्ही मिरवणुका काढता, असे खडे बोलही खंडपीठाने सुनावले. न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठापुढे यावर मंगळवारी सुनावणी झाली. याचिके -वर पुढील सुनावणी ५ एप्रिलला होणार आहे.

दरम्यान, मारणेविरुध्द दाखल सात गुन्हे अद्यापही न्यायालयात प्रलंबित आहेत. या प्रलंबीत गुन्हयातील साक्षीदार, अन्यायग्रस्त व तक्रारदार यांच्या मनात भिती तयार करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. याप्रकरणाचा तपास अंमली पदार्थ विरोध वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *