लातूर : एकीकडे कोरोनाचा सामना करण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक नियम कडक करण्यात आले आहे. तर दुसरीकडे चाकूर नगरपंचायत येथील पाणी पुरवठा आणि स्वछता विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांची कोरोनाचे नियम मोडून सुरु असलेली मटन आणि दारु पार्टी गावकऱ्यांनी उघडकीस आणली आहे. या पार्टीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये संबंधित कर्मचारी दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल, […]
ताज्याघडामोडी
वधू-वरासह वऱ्हाडींना लग्नमंडपातून हाकलले; जिल्हाधिकारी निलंबित
अगरतला : कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे बहुतेक सर्वच राज्यांमध्ये लग्न समारंभांवर निर्बंध आणण्यात आले आहेत. उपस्थितांच्या संख्येसह मास्कचा वापर करण्याबाबत नियम करण्यात आले आहेत. त्याचे पालन केल्यास कारवाई केली जात आहे. अशाच एका लग्न समारंभावर जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांच्या फौजफाट्यासह छापा टाकला. त्यांनी वधू-वरासह वऱ्हाडींना अपमानित करून मंडपाबाहेर काढले. काहींना लाठ्याही खाव्या लागल्या. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी अपशब्द वापरल्याचे आरोपही […]
सीरम इंस्टीट्यूटचे आदर पुनावाला यांच्या जीवितास धोका
नवी दिल्ली : अवघे जग कोरोनाशी लढत असताना सध्या लसीकरणाला अनन्यसाधारण महत्त्व दिले जात आहे. महाभयंकर कोरोना विषाणूला हरवण्यासाठी लसीकरण हाच सर्वोत्तम पर्याय ठरणार असल्याचे जाणकारांचे मत आहे. याच अनुषंगाने लस उत्पादन करणारी सिरम इन्स्टिट्यूटला भारतासह संपूर्ण जगभर महत्त्व प्राप्त झाले आहे. त्याच अनुषंगाने या कंपनीचे सीईओ अदार पुनावाला यांच्या जिवीताला धोकाही संभावत आहे. संभाव्य […]
धक्कादायक! प्रेयसीच्या मदतीने पतीने 7 वर्षांच्या मुलासह पत्नीला दिला गळफास
दौंड, 28 एप्रिल: प्रेमात अडथळा येत असल्यामुळे एका व्यक्तीने आपल्या प्रेयसीच्या मदतीने पत्नी आणि 7 वर्षांच्या मुलांची हत्या केल्याची घटना पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी पती सचिन सोनवणेला पोलिसांनी अटक केली आहे. दौंड तालुक्यातील पाटस येथील स्वराज सोसायटीमध्ये 7 वर्षाच्या मुलासह आईचा गळफास घेतल्याच्या अवस्थेतील मृतदेहाचा उलगडा अवघ्या काही तासात यवत […]
कोविशिल्ड लस झाली आणखी स्वस्त
पुणे | सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोरोना लशीची किंमत आणखी कमी केली आहे. सीरमचे सीईओ अदर पूनावाला यांनी आपल्या कोरोना लशीची नवी किंमत जारी केली आहे. राज्य सरकारला कमीत कमी दरात ही लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोविशिल्ड कोरोना लशीची सुरुवातीची किंमत प्रति डोस राज्य सरकारसाठी 400 रुपये आणि खासगी रुग्णालयांसाठी 600 रुपये होती. राज्य […]
आमदारालाच 24 तास मिळाला नाही ICU बेड; कोरोनाने झाला मृत्यू
लखनऊ, 28 एप्रिल : देशातील कोरोना परिस्थिती इतकी भीषण झाली आहे की अगदी सत्ताधारी पक्षातील आमदारालाही ICU बेड मिळाला नाही. त्यामुळे सत्ताधारी पक्षातील भाजप आमदाराचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशच्या बरेलीतील भाजप आमदार केसर सिंह गंगवार यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. केसर सिंह गंगवार बरेलीतल्या नवाबगंजमधील आमदार. 18 एप्रिलला ते कोरोना पॉझिटिव्ह झाले होते. […]
लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर नागरिकांची झुंबड; पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज
बीड, 28 एप्रिल: बीड जिल्ह्यात कोरोनाचा समुह संसर्ग झपाट्याने वाढत चालल्यामुळे कोरोनापासून बचाव करण्यासाठी आता जिल्ह्यातील नागरिक लस घेण्यासाठी धावपळ करू लागले आहेत. मात्र लसीचा तुटवडा असल्याने आज जिल्ह्यात केवळ तीन ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु होते अन्य 127 लसीकरण केंद्र लसी अभावी बंद करावे लागले. आज सकाळी आरोग्य विभागाकडे केवळ 2600 लसींचे डोस उपलब्ध होते. दुपारपर्यंत […]
पंढरपूरातही होणार कोरोना रुग्णांना आकारण्यात आलेल्या बिलांची पडताळणी
कोरोना रुग्णांवर ज्या खासगी रुग्णालयांत उपचार होत आहे अशा काही रुग्णांलयांनी शासनाने निर्देशित केलेल्या दरापेक्षा अधिक दर लावून बिलाची आकारणी केल्यास सदर बिलांची पडताळणी करण्यात येणार असून यासाठी प्रांताधिकारी पंढरपूर यांच्याशी संपर्क केला असता कोविड हॉस्पिटल कडून कोरोना रुग्णांवर उपचारासाठी आकारण्यात येणाऱ्या बिलांची पडताळणी करण्यासाठी संजय सदावर्ते यांच्यासह ५ जणांची विशेष समिती स्थापित केल्याचे सांगितले. […]
राज्याच्या गृहमंत्र्यांच्या नावे मागितला १० लाखांचा हप्ता!
अकोला ः येथील प्रसिद्ध विजय ट्रान्सपोर्टच्या मालकाला गृहमंत्र्यांच्या नावाने दहा लाखांचा हप्ता मागितल्याची तक्रार पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपासून ते १३ जणांकडे करण्यात आली आहे. यात हप्तासाठी खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देवून आठ तास स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात डांबून ठेवल्याचा आरोप ट्रान्सपोर्ट संचालकाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पाच कर्मचाऱ्यांविरुद्ध केला आहे. अकोला येथील वाशीम बायपास रोडवरील गंगानगर येथे विजय ट्रान्सपोर्टचे […]
राज्यात कडक निर्बंध 10 दिवस वाढणार?
मुंबई : लॉकडाऊन केल्यामुळे रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. त्यामुळे आणखी दहा दिवस लॉकडाऊन वाढवावा, असा सूर मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांनी मंगळवारी बैठकीत लावला. त्यामुळे बुधवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याविषयी शिक्कामोर्तब केले जाईल, असे सूत्रांनी सांगितले. तसेच सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये पुन्हा तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगत आहेत, त्यामुळे आपल्याला पूर्ण तयारी करून घ्यावीच लागेल, […]